हार्ले डेव्हिडसन वाढवणार पोलिसांचा रूबाब
रॉयल एनफिल्ड ही आजवर पोलीस दलातील शानदार दुचाकी. पोलीसाचा रूबाब पहायचा तर याच गाडीवर. पण, आता रॉलय एनफिल्ड मागे पडून तिची जागा हार्ले डेव्हिडसन ही दुचाकी घेणार आहे. कोलकातातील पोलीस लवकरच हार्ले डेव्हिडिसनवर फिरताना दिसतील.
कोलकाता : रॉयल एनफिल्ड ही आजवर पोलीस दलातील शानदार दुचाकी. पोलीसाचा रूबाब पहायचा तर याच गाडीवर. पण, आता रॉलय एनफिल्ड मागे पडून तिची जागा हार्ले डेव्हिडसन ही दुचाकी घेणार आहे. कोलकातातील पोलीस लवकरच हार्ले डेव्हिडिसनवर फिरताना दिसतील.
महागड्या दुचाकींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी हार्ले डेव्हिडसन कोलकाता पोलिसांच्या सेवेत दाखलही झाली आहे. रॉयल एनफिल्डच्या तुलनेत ही बाईक अधिक शक्तीशाली असल्याचे सांगितले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, हार्ले डेव्हिडसनच्या एका बाईकची किंमत सुमारे ५ लाख रूपयांच्या घरात आहे. असा सुमारे १२ 'हार्ले-डेव्हिडसन स्ट्रीट ७५०' कोलकाता पोलिसांनी विकत घेतल्या आहेत. अत्यंत वेगवान म्हणून ओळखली जाणारी ही बाईक ताशी ० ते १०० किमीचा वेग केवळ ६ सेकंदात गाठू शकते.