मुंबई : दमदार परफॉर्मन्स आणि आकर्षक रंग आणि आवाजासाठी ओळखली जाणाऱ्या रॉयल एनफिल्डला जगभरातील ग्राहकांची पसंती मिळतेय. नुकतीच रॉयल एनफिल्डनं भारतीय बाजारात आणलेल्या 'क्लासिक ५०० पेगासस'च्या लिमिटेड एडिशनचा स्टॉक अवघ्या तीन मिनिटांत संपला, यातच या बाईकच्या लोकप्रियतेची प्रचिती यावी... रॉयल एनफिल्डनं भारतीय बाजारासाठी 'क्लासिक ५०० पेगासस'चे केवळ २५० युनिटस विक्रीसाठी ठेवले होते... ऑनलाईन विक्रीत केवळ १७८ सेकंदांत हे सगळे युनिटस विकले गेले... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीनं 'क्लासिक ५०० पेगासस'ची २.४९ लाख रुपये किंमत निर्धारीत केली होती. पहिल्यांदा कंपनीनं या बाईकच्या ऑनलाईन विक्रीसाठी १० जुलै ही तारीख निश्चित केली होती. परंतु, वेबसाईट क्रॅश झाल्यानं २५ ऑगस्ट २०१८ ही तारीख निश्चित करण्यात आली. ठरल्यानुसार, २५ तारखेला सायंकाळी ४ वाजता या बाईकची ऑनलाईन विक्री खुली झाली... आणि पुढच्या केवळ तीन मिनिटांत या बाईकचा निर्धारित करण्यात आलेला स्टॉक संपला होता... त्यामुळे सेल बंद करावा लागला. 


आता प्रतिक्षा'क्लासिक ५०० पेगासस'ची


'क्लासिक ५०० पेगासस'नंतर आता प्रतिक्षा आहे ती 'क्लासिक ३५० पेगासस'ची... आज ही नवी एडिशन लॉन्च केली जाऊ शकते. ही बाईक नेव्ही ब्लू आणि आर्मी ब्राऊन रंगांत दिसू शकते. हे रंग भारतीय आर्म्ड फोर्सेसनं प्रेरित आहेत. या दोन्ही बाईकच्या फ्युएल टँकवर भारतीय झेंड्याच्या तीन रंगांचा एक चौकोन असेल यावर ४९ लिहिलेलं असेल. 


'क्लासिक ३५० पेगासस'चेही लिमिटेड युनिटस बाजारात आणले जाण्याची शक्यता आहे. 'क्लासिक ३५०'हून याची किंमत २०-२५ हजारांनी जास्त असू शकेल.