दमदार `रॉयल एनफिल्ड`च्या दोन शानदार बाईक बाजारात
बाईक बनवणारी कंपनी रॉयल एनफील्डनं आपल्या लोकप्रिय मॉडल `थंडरबर्ड` सीरिजमध्ये आणखीन दोन नव्या बाईक लॉन्च केल्यात.
मुंबई : बाईक बनवणारी कंपनी रॉयल एनफील्डनं आपल्या लोकप्रिय मॉडल 'थंडरबर्ड' सीरिजमध्ये आणखीन दोन नव्या बाईक लॉन्च केल्यात.
गुरुवारी एका कार्यक्रमात थंडरबर्ड ५०० एक्स (Thunderbird 500X) आणि थंडरबर्ड ३५० एक्स (Thunderbird 350X) अशा दोन बाईक लॉन्च करण्यात आल्यात. या दोन्ही बाईकची अनुक्रमे किंमत १,९८,८७८ रुपये आणि १,५६,८४९ रुपये आहे.
थंडरबर्ड ५०० एक्स
थंडरबर्ड ५०० एक्समध्ये सिंगल सिलिंडरचं ४९९ सीसी एयर कूल इंजिन आहे. यामध्ये ४००० आरपीएमवर ४१.३ न्यूटन मीटर टार्क जनरेट होतो. या बाईकचं वजन १९५ किलो आहे. या बाईकची किंमत १,९८,८७८ रुपये आहे.
थंडरबर्ड ३५० एक्स
थंडरबर्ड ३५० एक्स मध्ये, ३४६ सीसी सिंगल सिलिंडर एअर कूल इंजिन आहे. बाइकमध्ये ट्विन स्पार्क सुविधा देण्यात आलीय. यामध्ये ४००० आरपीएमवर २८ न्यूटन मीटर टार्क जनरेट होतो. या बाईकचं वजन १९७ किलो आहे. या बाईकची किंमत १,५६,८४९ रुपये आहे.
आणखीन काही फिचर्स
दोन्ही बाईकच्या इंजिनमध्ये ५ स्पीड गियरबॉक्स देण्यात आलाय. दोन्हींमध्ये एलईडी डे टाईम रनिंग लॅम्प आणि एलईडी टेल लॅम्प देण्यात आलाय.
तसंच बाईकमध्ये ९ स्पोक अलॉय व्हील्स, ट्यूबलेस टायर, सिंगल पीस सीट, ब्लॅक फॉर्क कव्हर, ब्लॅक एग्झॉस्ट आणि ब्लॅक हेडलॅम्प देण्यात आलेत. सुरक्षेसाठी दोन्ही बाईकच्या फ्रंट टायरमध्ये २८० एमएमचं डिस्क ब्रेक आणि रिअर टायरमध्ये २४० एमएमचं डिस्क ब्रेक आहे.
तरुण ग्राहकांची संख्या लक्षात घेतला या दोन्ही बाईक चार नव्या रंगात सादर करण्यात आल्यात. यामध्ये ड्रिफ्ट ब्लू, गेटवे ऑरेंज, रोविंग रेड आणि व्हिम्सिकल व्हाईट असे रंग उपलब्ध आहेत.