तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? या विभागात बंपर भरती, लगेच करा अर्ज
Indian Railway Recruitment 2024 : तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्याकडे ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे या मेगा भरतीला सुरूवात झाली असून भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास तुम्हीपण सुरुवात करु शकता. इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी कोणताही विलंब न करता अर्ज करावा.
RRB ALP Recruitment 2024 News in Marathi : सरकारी नोकरीच्या शोधात असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता य भरती प्रक्रियेसाठी त्वरित अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही खरोखरच मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिसूचना ही प्रकाशित केली असून तुम्हाला थेट भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट पदांच्या 5 हजार 696 जागाकरिता ही महाभरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती अंतर्गत पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, मिळणारे वेतन आणि भरती अंतर्गत अर्ज करण्याची नेमकी पद्धत कशी असणार आहे ते जाणून घ्या...
भारतीय रेल्वेने तरुणांसाठी भरतीच्या अधिसूचना जारी असून रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी बंपर भरती जारी केली आहे. या भरतीची माहिती एम्प्लॉयमेंट न्यूज पेपरमध्ये (19 ते 26 जानेवारी 2024) दिली आहे. अधिसूचना जारी केल्यानंतर, RRB द्वारे अर्जाच्या तारखा देखील घोषित केल्या जातील. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 जानेवारी 2024 पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइनद्वारे फॉर्म भरू शकतात. अर्ज कसा करायचा? वयोमर्यादा किती आहे? ते जाणून घ्या...
कोणते पदासाठी जागा रिक्त
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने असिस्टंट लोको पायलटसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे सहाय्यक लोको पायलटच्या एकूण 5,969 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
कोण अर्ज करू शकेल?
उमेदवार कोणत्याही क्षेत्रात आयटीआय डिप्लोमा उत्तीर्ण असावा. तसेच, उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. राखीव श्रेणी अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सवलत दिली जाईल. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत सूचना वाचणे आवश्यक आहे.
निवड कशी केली जाईल?
संगणक आधारित चाचणी-1 (CBT)
संगणक आधारित चाचणी-2 (CBT)
संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय चाचणी
अर्ज फी
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि वर्ग III अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फक्त 250 रुपये भरावे लागतील.
मिळणार एवढा पगार
सातव्या वेतन आयोगानुसार 19,900 रुपये बेसिक प्रमाणे मुळे वेतन आणि महागाई भत्ता देण्यात येतील.
अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IndianRailways.gov.in या अधिकृत साइटला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी तुम्हाला अधिकृत साइटला भेट द्यावी लागेल.