नवीन दिल्ली: सरकार नवीन नाणे घेऊन येत आहे, त्याची तयारी सध्या सुरू आहे. हे नाणे शंभर रुपयांचे आहे आणि त्यावर माजी पंतप्रधान अटलबिहारी यांचा फोटो लावण्यात आला आहे. माजी पंतप्रधान यांच्या ९५वी जयंती निमित्ताने भारत सरकार हे नाणे घेऊन येणार आहे, याची घोषणा केली. सुत्रांनुसार सरकारकडून याची तयारी झाल्याची माहिती मिळाली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ मध्ये ग्वाल्हेर येथे झाला. अटलबिहारी यांचा जन्मदिवस आणखी खास बनवण्यासाठी सरकार तयारीत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


अशा प्रकारे असणार शंभर रुपयांचं नाणं


नाण्याच्या एका बाजूस माजी पंतप्रधान वाजपेयी यांचे स्मारक आणि देवनागरी तसेच इंग्रजी भाषेत त्यांचं नाव लिहिलं जाणार आहे. तसेच दुसऱ्या बाजूस अशोक स्तंभ आहे. नाण्यातील फोटोच्या खालील भागात वाजपेयी यांचे जन्मवर्ष १९२४ आणि मृत्यू २०१८ दर्शविण्यात आला आहे. या नाण्याचं वजन ३५ ग्रॅम असेल. नाण्याच्या उजव्या बाजूस 'भारत' हे देवनागिरीत. तर डाव्या बाजूस इंग्रजीमध्ये लिहिलं जाणार आहे.


नाणे तयार करताना या धातूंचा वापर करण्यात आला



३५ ग्रॅमच्या या नाण्यात ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्त असणार आहे. शंभर रुपयाचे हे नाणे चलनात येणार नाही. भारत सरकार नाणे बुकिंग करण्यासाठी वेळ ठरवणार आहे. याला प्रीमिअम दरात विकण्यात येणार आहे. ३३०० ते ३५०० च्या प्रीमियम दरात नाणे विकण्याची अपेक्षा आहे. ट्रेझरीतून याची खरेदी केली जावू शकते.