पाटणा : बिहारच्या भागलपूरमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलेल्या गंगा पंप कॅनॉल प्रकल्पाचे उद्घाटन होण्यापूर्वी धरणाची भिंतच वाहून गेलेय. याचा फटका आजुबाजुच्या परिसराला बसलाय. दरम्यान, या धरण बांधकामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाने केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भागलपूरमध्ये कोट्यवधी रुपयांच्या बांधलेल्या गंगा पंप कॅनॉल प्रकल्प बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आरजेडीने केलाय. धरणाचे उद्घाटन करण्यापूर्वी एक दिवस आधी हे धरण वाहून गेले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते या धरणाचे उद्घाटन होणार होते. आता हा कार्यक्रम रद्द केला आहे. 


बिहार आणि झारखंडमधील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी पुरवण्यासाठी हे धरण बांधलपूर जिल्ह्यातील बटेश्वरस्थानात गंगा नदीवर ३८९.३१ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांची महात्वाकांक्षी योजना आहे. बुधवारी या धरणाचे उद्घाटन होते. मंगळवारी पाण्याचा जास्त दबाव वाढल्यामुळे धरणाची भिंत कोसळली. 


 राज्यातील मुख्य विरोधी पक्ष राजदने या धरण प्रकल्पाच्या विरोधात हायते कोळीत मिळालेय. नीतीश कुमार सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आमदार रामविलास पासवान यांनी पत्रकारांना सांगितले की, कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर भागलपूरमध्ये एक नवीन घोटाळा उघडण्यात आला आहे.