नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला जे काठावर यश मिळाले त्यावरुन राष्ट्रीय स्वंय सेवक संघ (आरएसएस) नाराज आहे. मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये आरएसएसची बैठक झाली. या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा  झाली. सूत्रांच्या माहितीनुसार झी मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार संघाने भाजप नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेऊ शकतो.


भाजप नेतृत्वात बदल करण्याची गरज  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे सांगितले जाते की, गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर संघ आणि भाजप  पदाधिकाऱ्यांची बैठक  झाली. यात निर्णय झालाय की भाजप नेतृत्वात बदल करण्याची गरज आहे. तसेच भाजपमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली पाहिजे.


काँग्रेस भाजपची डोकेदुखी


गुजरात निवडणुकीत भाजपला विजय मिळाला तरी झगडावे लागले आहे. विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये खूप कमी अंतर आहे. ९९ जागा भाजपला आणि काँग्रेसला ८० जागा मिळाल्यात. तर तीन जागा अन्य लोकांना गेल्यात. काँग्रेसची मते ४१.४ टक्क्यांनी वाढली आहेत. त्यामुळे पुढे भाजपला राजकीय डोकेदुखी होणार आहे.


दोन मंत्री नाराज, धोक्याची घंटा


पटेल समुदाय नाराज आहे. त्यात पटेल समाजाचे नेत आणि उपमुख्यमंत्री नितीन पटले आणि कोळी समाजाचे नेते मंत्री पुरुषोत्तम सोलंकी हे देण्यात आलेल्या पदावरुन नाराज आहे. त्यामुळे ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.



काँग्रेसची ऑफर आली तर?


अमित शाह यांनी या दोघांना त्यांच्या आवडीचे मंत्रालय देण्याचे आश्वासन दिलेय आणि शांत केलेय. मात्र, ही नाराजी काँग्रेस पकडून त्यांना चांगल्या पदाची ऑफर देऊ शकते. त्यामुळे १० ते १२ आमदार त्यांना फोडावे लागतील. जर त्यांनी त्यात यश मिळवले तर काँग्रेस सरकार स्थापन करु शकते.


'नितीन पटेल भाजप सोडा?'


काँग्रेस आमदार वीरजी थुम्मर यांनी म्हटलेय, नितीन पटेल यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसशी हात मिळवणी करावी. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवावे. त्यामुळे काँग्रेसने जर त्यांना गळाला लावले तर गुजरातमधील भाजप सरकार पडण्याची भीती व्यक्त होत आहे.  त्यामुळे भाजपच्या गोठात धडकी भरली आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.