मोदी सरकारच्या बजेटवर RSS नाराज...
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८-१९ या वित्त वर्षासाठी बजेट सादर केले.
नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८-१९ या वित्त वर्षासाठी बजेट सादर केले. हे बजेट गरिबांचे स्वप्न पूर्ण करेल, असे सांगण्यात येत आहे. यावर इतर पक्षांच्या तिखट प्रतिक्रीया आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना नाराज
त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची प्रतिक्रीया सरकारसाठी चिंता वाढवणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जोडलेले मजूर संघाने या बजेटवर निशाणा साधला आहे. या बजेटमुळे भारतीय मजूर संघ निराशा आहे आणि याविरोधात ते शुक्रवारी संपूर्ण देशात त्याचे प्रदर्शन करणार. आरएसएस नव्हे तर शिवसेनाने देखील या बजेटवर टिका केली आहे.
लालूंनीही केली टीका
बहुचर्चित चारा घोटाळ्यात आरोपी ठरलेले आणि सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांनी देखील बजेटवर निशाणा साधला. कारण त्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही. आपल्या ट्विटर हॅंडलवरून लालूंनी ट्वीट केले की, शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. त्याचे उत्तर द्या. त्यांचे कर्जमाफी का मिळाली नाही ? शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत?
मात्र हे सकारात्मक बजेट असल्याचे...
निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले की, ''घरगुती उत्पादनात ८% वृद्धी झाली आहे. त्याचबरोबर कृषी क्षेत्रात बदल आणण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. हे खरंच सकारात्मक बजेट आहे''.