RSS यंदा पहिल्यांदाच करणार इफ्तार पार्टीचं आयोजन
RSS चे महत्त्वाचे नेते डॉक्टर इंद्रेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यंदा पहिल्यांदाच इफ्तार पार्टीचं आयोजन कऱणार आहे. आरएसएसचा भाग असलेला मुस्लीम राष्ट्रीय मंच (Muslim Rashtriya Manch) रमजानमध्ये इफ्तार पार्टी भरवणार आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये रमजान महिन्यातल्या पहिल्या वीस दिवसांमध्ये या पार्ट्या आयोजित करण्यात येतील. तर नंतरचे १० दिवस आरएसएस ईद मिलापचा कार्यक्रम असणार आहे. आरएसएसमधले महत्त्वाचे नेते डॉक्टर इंद्रेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शी संबधित मुस्लीम राष्ट्रीय मंच (Muslim Rashtriya Manch) एप्रिलमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करणार आहे. देशभरात इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जाणार आहे. ज्यामध्ये मोठे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
पीटीआयच्या माहितीनुसार, मुस्लीम राष्ट्रीय मंचाचा प्रत्येक कार्यकर्ता रमजानच्या पवित्र महिन्यात कमीत कमी एक दिवस इफ्तारचं आयोजन करणार आहे.