राम मंदिर संदर्भातील निर्णयाचे खुल्या मनाने स्वागत करा- संघ
राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण
नवी दिल्ली : राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली आहे. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला असून ८ नोव्हेंबरनंतर हा निर्णय सुनावला जाऊ शकतो. हा निर्णय येण्याआधी सर्वजण शांतता आणि बंधुभाव राखण्याचे आवाहन करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ट्वीट करत शांततेच आवाहन केले आहे.
येत्या काही दिवसात राम जन्मभूमीवर मंदीर निर्माणावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. निर्णय कोणताही असो आपण तो खुल्या मनाने स्वीकारला पाहीजे. निर्णयानंतर देशभरात शांतता कायम राहीय ही सर्वांची जबाबदारी आहे.
याआधी विश्व हिंदू परिषद आणि बाबरी मशीदीचे पक्षकार इकबाल अंसारी यांनी देखील बंधुभाव राखण्याचे आवाहन केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील शांततेचे आवाहन केले आहे.