नवी दिल्ली : देशातील कोरोना केसेस वाढत असल्याने चाचणीचा व्याप देखील वाढला आहे. लॅब आणि चाचणी केंद्रांवर नागरिकांची बरीच गर्दी असते. आरटी-पीसीआर अहवाल येण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. अशा परिस्थितीत रिपोर्टची वाट पाहत असल्याने काही जलोक योग्य उपचार सुरू करू शकत नाहीत. तसेच रिपोर्ट न दिल्यामुळे अनेकजण नॉर्मल आयुष्य जगू शकत नाहीत अशांवर याचा गंभीर परिणाम होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान तज्ज्ञांनी यावर सकारात्मक माहिती दिली आहे. सौम्य आणि मध्यम संसर्ग झालेल्या रूग्णांना 14 दिवसानंतर कोरोना निगेटीव्ह असल्याची पुष्टी करण्यासाठी पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी घेण्याची आवश्यकता नसल्याचे तज्ञांनी म्हटलंय.



सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी 


जर सौम्य संसर्ग झालेल्या रुग्णाला 3 दिवस सतत ताप येत नसेल तर लक्षणे दिसण्याच्या दिवसापासून त्याला 10 दिवस डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
- डिस्चार्ज वेळी पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही
- रुग्णाला 7 दिवस स्वत: ला घरी अलग ठेवण्याचा आणि त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो.


मध्यम लक्षणे असलेल्यांसाठी 


-रोग्याला लक्षणे दिसू लागल्याच्या 10 दिवसानंतर 3 दिवस सतत लक्षणे आढळली नाहीत तर त्याला डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
- डिस्चार्ज करण्यापूर्वी कोणत्याही चाचणीची आवश्यकता नाही
- रुग्णाला 7 दिवस स्वत: ला घरी अलग ठेवण्याचा आणि त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो.


गंभीर परिस्थितीत-


अशा परिस्थितीत आरटी-पीसीआर चाचणी घेणे गरजेचे आहे. हा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच आणि रुग्णाला वैद्यकीयदृष्ट्या बरे केल्यावरच सोडण्यात येते.


बहुतांश सौम्य आणि लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांमधील वायरस 7 व्या किंवा 8 व्या दिवशी मरतो. अशावेळी एका व्यक्तीकडून हा दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. पण मृत विषाणू किंवा त्याचे कण आरटी-पीसीआर चाचणीमध्ये सापडतात. ज्यामुळे व्यक्ती संसर्गमुक्त असूनही हा रिपोर्ट पॉझिटीव्ह येतो बनते. अशा परिस्थितीत रुग्णाला घाबरण्याची गरज नाही असे डॉक्टर संदीप पाटील यांनी सांगितले.