Rs 500 Note: 18 हजार कोटी 500 रुपयांच्या नोटा गहाळ झाल्याप्रकरणी आरबीआयने उत्तर दिले आहे. आरटीआयमध्ये दिलेल्या माहितीनुसार नवी अपडेट समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 500 रुपयांची नोट गहाळ झाल्याचा दावा पूर्णपणे फेटाळला आहे. आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचे खंडन केले आहे. ज्यात टांकसाळीतून जारी करण्यात आलेल्या 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे, तो चुकीचा आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार ही माहिती योग्य नाहीत. अधिकार्‍यांनी सांगितले की, माहिती अधिकार कायदा, 2005 अंतर्गत टांकसाळीतून घेतलेल्या माहितीच्या चुकीच्या अर्थावर नोटा गहाळ झाल्याचा दावा आधारित आहेत. टांकसाळीतून आरबीआयला पुरवलेल्या सर्व बँक नोटांचा योग्य हिशोब मिळाला आहे.


हरवलेल्या नोटाबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

RBI ने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, त्यांच्या सिस्टममधून 18 हजार कोटी 500 रुपयांच्या नोटा गहाळ झाल्याची बातमी चुकीची आहे. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीचा चुकीचा अर्थ लावल्याने हा प्रकार घडला आहे. नोटा छपाई प्रेसमधून 500 रुपयांच्या नोटांबाबत आरटीआय अंतर्गत दिलेल्या माहितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. माहितीच्या अधिकाराखाली काही प्रश्न विचारले होते आणि उत्तरात असे सांगण्यात आले की नवीन डिझाईन असलेल्या 500 रुपयांच्या लाखो नोटा गायब झाल्या आहेत. त्यांची किंमत हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, देशातील तीन प्रिंटिंग प्रेसमधून 500 रुपयांच्या 8810.65 कोटी नोटा नवीन डिझाईनसह छापल्या. परंतु रिझर्व्ह बँकेला यापैकी केवळ 726 कोटी नोटा मिळाल्या. एकूण 500 रुपयांच्या 1760.65 कोटी नोटा गायब झाल्या, ज्यांचे मूल्य 88,032.5 कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण देताना सांगितले की, हे देखील लक्षात घेतले पाहिजे की प्रसिद्ध झालेल्या आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पुरविल्या जाणार्‍या बॅंक नोट्सच्या जुळणीसाठी मजबूत प्रणाली आहे. ज्यामध्ये नोटांचे उत्पादन, साठवण आणि वितरण यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रोटोकॉल समाविष्ट आहेत. अशा प्रकरणांमध्ये आरबीआयने वेळोवेळी जारी केलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन आहे.



नोटांबाबत आरबीआयचा निर्णय


यापूर्वी 19 मे रोजी आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, 2000 ची नोट कायदेशीर चलनात राहील, असेही सांगण्यात आले. तथापि, RBI ने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या लोकांकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते RBI च्या बँक आणि प्रादेशिक शाखेत जाऊन त्या बदलू शकतात किंवा जमा करू शकतात. दुसरीकडे, ज्या लोकांकडे बँक खाते नाही ते कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन 2,000 रुपयांच्या नोटा एकावेळी 20,000 रुपयांपर्यंत बदलू शकतात.