इंग्रजांनी पगडीची उडवली खिल्ली, उत्तर म्हणून खरेदी केल्या 7 रंगाच्या रॉल्स रॉयस
7 रंगाच्या रॉल्स रॉयस विकत घेऊन दाखवून दिला पगडीचा मान, अनेकांनी तोंडात घातली बोटं
नवी दिल्ली : आपला स्वाभिमान आणि सन्मान राखण्यासाठी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो याचा विचारही करू शकत नाही. एका व्यक्तीनं चक्क आपल्या पगडीचा स्वाभिमान आणि मान जपण्यसाठी आपल्या कर्तृत्वानं बोलणाऱ्यांची तोंडं बंद केली आहेत.
एक सरदार सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. रुबेन सिंग असं या व्यक्तीचं नाव आहे. हे रुबेन सिंग AlldayPA कंपनीचे मालक आहेत. एकदा इंग्रजांनी त्यांच्या पगडीची खिल्ली उडवली होती. या खिल्लीला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी आपलं कर्तृत्व संपूर्ण जगाला दाखवून दिलं.
आज रुबेन सिंग यांची कामगिरी ऐकून भलेभलेही तोंडात आश्चर्यानं बोटं घालतील. जेवढ्या रंगाच्या माझ्याकडे पगड्या असतील तेवढ्या रंगाच्या रॉल्स रॉयल्स गाड्या माझ्याकडे असतील. रुबेन सिंग यांनी असं इंग्रजांना आव्हान दिलं होतं.
रुबेन सिंग यांनी हे जगाला दाखवून दिलं. आज त्यांच्याकडे त्यांच्या पगड्यांच्या रंगाएवढ्या गाड्या दारात उभ्या आहेत. त्याची पोस्ट सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चेत आहे. रुबेन सिंग यांनी ‘British Bill Gates' असं म्हटलं जायचं.
एक वेळ अशी होती की त्यांच्याकडे 10 मिलियन पाऊंडहून अधिक जोमात व्यवसाय व्हायचा मात्र परिस्थिती सारखी राहात नाही. तसंच झालं. एक वेळ अशी आली की 1 पाउंडवर त्यांना आपला व्यवसाय विकण्याची वेळ आली होती.
रुबेन सिंग यांनी वयाच्या 17 व्या वर्षापासून आपला व्यवसाय इंग्लंडमध्ये सुरु केला. एक वेळ अशी होती की इंग्लंडमध्ये त्यांचा व्यवसाय खूप जास्त चालला. 90 च्या दशकात रुबेन सिंग कापडाचे सर्वात मोठे व्यवसायिक होते.