नवी दिल्ली : देशभरात लॉकडाऊनदरम्यान आजपासून काही क्षेत्रांमध्ये काम सुरु करण्यास सूट देण्यात आली आहे. मात्र ही सूट ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या जिल्ह्यांना देण्यात आली आहे. ज्या शहरात, जिल्ह्यात अतिशय कमी कोरोना रुग्ण आहेत तेथेच लॉकाडाऊन काही निर्बंधांसह शिथिल करण्यात आला आहे. काही क्षेत्रांना यातून सूट देण्यात आली असली तरी त्यांना लॉकडाऊनदरम्यान असलेल्या सर्व नियमांचं पालन करणं अनिर्वाय आहे. सोशल डिस्टंन्सिंग पाळणं गरजेचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20  एप्रिलपासून इलेक्ट्रिशियन, प्लंबर आणि कारपेंटर निर्बंधांसह काम सुरु करु शकतात. परंतु यासाठी इलेक्ट्रिशियन, प्लंबर आणि कारपेंटर यांना काही नियम पाळणं अत्यावश्यक आहे. तसंच या सेवेतील लोकांकडून, सेवा घेताना ग्राहकांनाही नियम पाळणं गरजेचं आहे. 


इलेक्ट्रिशियन, प्लंबर किंवा कारपेंटर यांच्याकडून काम करुन घेण्यासाठी, त्याचं आणि ग्राहकाचं घर ग्रीन झोनमध्ये असणं आवश्यक आहे. दोघांचंही घर ग्रीन झोनमध्ये असल्यास अशा व्यक्तीला घरी काम करण्यासाठी बोलवू शकता.


ज्या कारपेंटर किंवा इलेक्ट्रिशियनला काम करण्यासाठी बोलवणार असाल तर त्याचं आणि तुमचं घर ग्रीन झोनमध्ये असेल तरच त्याला फोन करा. दोघेही ग्रीन झोनमध्ये असतील तरच त्याला काम करण्यासाठी परवानगी द्या.


प्लंबर, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन आणि इतर मेकॅनिकांनी ग्राहकांना सेवा देण्यासाठी नगरपालिका, ग्रामपंचायत, पोलीस, जिल्हा कार्यालयात ओळखपत्र देऊन पास बनवणं आवश्यक आहे. 


वाचा - लॉकडाऊनदरम्यान उद्यापासून 'या' क्षेत्रांमध्ये काम सुरु होणार


वाढता उन्हाळा, गरमी पाहता हरियाणा सरकारने जिल्ह्यात एसी, कूलर आणि पंखा दुरुस्त करणारी काही दुकानं सुरु करण्याची परवानगी दिली आहे. ही दुकानं सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 7 पर्यंत सुरु राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.