Rules chaging from 1st november: नोव्हेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. नवा महिना नव्या बदलांसह सुरु होणार आहे. या महिन्यापासून काही बदल करण्यात आले आहेत. त्याचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) 1 नोव्हेंबरपासून विमा कंपन्यांना KYC प्रदान करणे अनिवार्य करू शकते. नॉन-लाइफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना KYC तपशील देणे ऐच्छिक असेल. जर तुम्ही विमा दावा करताना KYC कागदपत्रे सादर केली नाहीत, तर तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल केला जातो. तेल कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या जातील. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती बदलू शकतात. एलपीजी सिलिंडरच्या वितरणाशी संबंधित प्रक्रियेतही बदल होणार आहे. गॅस बुक केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. जेव्हा सिलिंडर डिलिव्हरीसाठी येतो तेव्हा तुम्हाला हा OTP डिलिव्हरी बॉयसोबत शेअर करावा लागेल. हा कोड सिस्टीमशी जुळल्यानंतर ग्राहकाला फक्त सिलिंडरची डिलिव्हरी मिळेल.


Video: सात वर्षांच्या मुलीनं पहिल्यांदाच ऐकला आवाज, Reaction पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी


गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल होणार आहे. भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. 13 हजार पॅसेंजर ट्रेन आणि 7 हजार मालगाड्यांच्या वेळा बदलतील. देशात धावणाऱ्या सुमारे 30 राजधानी गाड्यांच्या वेळाही 1नोव्हेंबरपासून बदलणार आहेत.