Goa Homestay House Video: डिसेंबर ख्रिसमसचे दिवस जवळ आले की, लोकांना वेध लागतात ते फिरण्याचे. थोडा दररोजच्या दिनक्रमातून आराम घेत लोकं बाहेर राहण्याचा पर्याय स्वीकारतात. अशावेळी हॉटेल्स बरोबर हल्ली लोकं होम स्टेचा पर्याय देखील निवडतात. हल्ली होम स्टेमध्ये राहण्याला लोक पसंती देतात. पण एका होम स्टे मालकाने शेअर केलेला व्हिडीओ अतिशय धक्कादायक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता गोव्यातील होमस्टेच्या मालकाने आपल्या सुंदर घराची केलेली भयावह अवस्था फोटोंच्या माध्यमांतून शेअर केली आहे. या होमस्टेच्या मालकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी भाडेकरूंना देण्यापूर्वी त्यांचे घर कसे होते आणि नंतर ते कसे बनले हे दाखवले आहे.


एका रात्रीत अशी झाली घराची अवस्था



होमस्टेच्या मालकाने गोल्ड पर्च नावाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचे कॅप्शन असे लिहिले आहे की, 'फक्त एका रात्रीसाठी घर पेइंग गेस्टला दिले आणि बघा त्याने काय परिस्थिती निर्माण केली आहे'. एका रात्रीत किचन, बेडरूम आणि लिव्हिंग रूम कशी उद्ध्वस्त झाली आहे, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. किचन सिंक आणि सिंकवर घाणेरड्या भांड्यांचा ढीग पडला आहे, बेडरुममध्ये कपडे इकडे तिकडे पडले आहेत आणि या सुंदर घराचे पडदेही अस्वच्छ झाले आहेत.


त्याचबरोबर या घराच्या मालकाने लिहिले आहे की, 'मी हे घर दोन वर्षांपासून भाड्याने देत आहे आणि आता या दोन वर्षांत पहिल्यांदाच हा प्रकार उघडकीस आला आहे, जेव्हा तुम्ही मेहनत करता आणि कोणीतरी ते खराब करते.आम्ही म्हणत नाही की घरातील कोणत्याही गोष्टीला हात लावू नका, परंतु तरीही हे असे करू नका, एअरबीएनबी चालवणे सोपे काम नाही. आता या व्हायरल व्हिडिओवर लोकांचे काय म्हणणे आहे ते वाचा.


लोक काय म्हणतात?


या व्हिडिओमध्ये अनेक युजर्स होमस्टेच्या मालकाचे समर्थन करत आहेत आणि येथे राहणाऱ्या पाहुण्यांवर नाराज आहेत. त्याच वेळी, काही असे आहेत की जे घर स्वच्छ करण्याची जबाबदारी होमस्टे मालकाची आहे आणि त्याचे शुल्क देखील भाड्यात आकारले जात आहे. त्याचवेळी, एकाने लिहिले आहे की, 'जर तुम्ही सेवा देऊ शकत नसाल तर ही एअरबीएनबी चालवू नका, तुमची ही मालमत्ता विकून टाका. आता काहीजण या होमस्टेच्या मालकाचे समर्थन करत आहेत तर काही याला सेवेचा एक भाग म्हणत आहेत.