नवी दिल्ली :  RBI News : रुपयाची घसरण (Rupee Depreciation) रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक (RBI Policy) काय उपाययोजना करते याकडे आर्थिक जगताचं लक्ष लागले आहे. आज रिझर्व्ह बँक अर्धा टक्का व्याजदर वाढ घोषीत करेल यावर तज्ज्ञांचं एकमत आहे. (The Reserve Bank is likely to announce a half percent interest rate hike)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महागाई रोखण्यासाठी आत्तापर्यंत तीन वेळा व्याजदरात वाढ केलीय. पण डॉलरच्या तुलनेची रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. त्यामुळे व्याजदर वाढीचा हा उपाय महागाई तितकासा परिणाम कारक ठरत नाही. चालू आर्थिक वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपया साधारण 10 टक्के घसरला आहे. 


डॉलरची ही घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करत असते. आतापर्यंत हा हस्तक्षेप मर्यादित स्वरुपाचा असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता रुपयाची घसरण थांबवण्यासाठी पतधोरण आढावा बैठकीत आरबीआय गव्हर्नर काय धोरण सांगतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 


पुन्हा गृहकर्जासह सर्व कर्ज महागणार


बँकांची कर्ज महागण्याची शक्यता आहे. बँका आज रेपो रेटमध्ये 0.50 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. रेपो रेट वाढल्यास कॉस्ट ऑफ बॉरोईंग वाढणार आहे. बँका याचा भार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहकर्जासह सर्व कर्ज महागण्याची शक्यता आहे. यामुळे घरांच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Again, all loans, including home loans, will become expensive)


आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची आज बैठक संपणार आहे. याआधी 5 ऑगस्टला आरबीआयने रेपो दरात अर्धा टक्के वाढ करून 5.40 टक्के रेपो रेट केला होता. अमेरिकेत वाढणा-या व्याजदरांचा हा परिणाम मानला जात आहे.