ऐश्वर्या- दीपिकाचे फोटो पाहण्यापेक्षा या तरुणीची इतकी चर्चा का होतेय ते वाचा
सध्या मात्र एक तरुणी या बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसत आहे
Russia-Ukraine war : बॉलिवूड अभिनेत्रींना मिळणारी पसंती आपण सर्वजण जाणतो. किंबहुना आपणही अशाच एका अभिनेत्रीच्या प्रेमात असतो. पण, सध्या मात्र एक तरुणी या बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसत आहे.
ही कोणी अभिनेत्री नाही, मॉडेल नाही, सोशल मीडिया
इंन्फ्लुएन्सर तर नाहीच नाही. पण मग ती इतकी प्रसिद्ध का होतेय?
तुम्हालाही प्रश्न पडतोय का?
तर, ही 24 वर्षीय मुलगी या कारणामुळं चर्चेत आहे की, तिनं युक्रेनच्या पॉलिश आणि हंगेरियन सीमांमध्ये अडकलेल्या 800 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना हवाईमार्गानं मायदेशी आणलं.
महाश्वेता चक्रवर्ती (Mahasweta Chakraborty) हिनं या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी सहा वेळा विमानावाटे उड्डाण भरलं.
'ऑपरेशन गंगा'चा अविभाज्य भाग असणाऱ्या महाश्वेता हिनं केलेल्या या कामाची सर्वदूर चर्चा झाली.
सहापैकी चार उड्डाणं पोलंड आणि दोन हंगेरी येथून घेतली. भाजप महिला मोर्चा या ट्विटर अकाऊंटवरुन तिच्या कामाची दखल घेतल त्याबाबतची माहिती दिली गेली.
करिअरच्या वेगळ्या वाटा निवड़त महाश्वेतानं तिचं स्वप्न साकार केलं. पुढे जसजशी संधी मिळत गेली, तसतसं तिनं या संधीचं सोनं केलं. ऑपरेशन गंगा हा त्याचाच एक भाग, असं म्हणायला हरकत नाही.