नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सकाळपासून युद्ध सुरू आहे. युक्रेन अजूनही रशियाच्या सैन्यासमोर झुकलं नाही. त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. या सगळ्या घडामोडीत एक महत्त्वाची बातमी येत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील घडामोडींना वेग आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींची ज्येष्ठ मंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे. पंतप्रधानांच्या बैठकीला संरक्षण गृहमंत्री उपस्थित आहेत.  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही बैठकीला उपस्थित आहेत. युक्रेनवरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतीन यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाची तातडीची बैठक घेण्यात येत आहे. 


रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात 20 हून अधिक सैनिक मारले गेल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे अनेक सैनिक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर पाहायला मिळू शकतात. इंधनाचे आणि सोन्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तर दुसरीकडे शेअर मार्केट मोठ्या आकड्यांनी कोसळलं आहे.