Russian Tourist Harassed in Jaipur: राजस्थानमध्ये दरवर्षी मोठ्यासंख्येने पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र, अनेकदा त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण केले गेले आहेत. सध्या सोशल मीडियावरही एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक भारतीय तरुण त्याच्या रशियन मैत्रिणीसोबत दिसत आहे. पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्याने महिलेसोबत छेडछाड केल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, या भारतीय तरुणाने नेमकं काय झालं हे सांगितलं असून घटनेचा व्हिडिओ बनवून इंटरनेटवर शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयपुरमध्ये व्हिक्टोरिया नावाची एक रशियन महिला भारतीय व्लॉगरसोबत डिनरसाठी जात होती. तेव्हा दोघे पेट्रोल भरण्यासाठी पंपावर थांबले होते. तेव्हा मोटारसायकलच्या मागे बसलेल्या विक्टोरिया हिला पेट्रोल पंपावरील कर्मचारी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. विक्टोरियाने याबाबत तिच्या मित्राला सांगितले. तेव्हा त्याने त्या कर्मचाऱ्याला याबाबत जाब विचारला. तेव्हा तो माफी मागायला लागला. त्याने म्हटलं की त्याच्याकडून चुकीने असं घडलं आहे. मात्र, तरुणाने काहीही ऐकून न घेता पोलिसांना फोन करत या घटनेबाबत माहिती दिली. 


तरुणाने पोलिसांत जायची धमकी दिल्यानंतर पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्याने माफी मागण्यास सुरुवात केली व चुकून असं घडलं असं म्हणत स्पष्टीकरण दिले. त्यावर तरुणाने चुक एकदाच होते सारखी सारखी नाही. तीन वेळा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला गेला. व्हिक्टोरियाच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीने तीन वेळा चुकीचा स्पर्श केला. असं म्हणत तरुणाने पोलिसांना फोन करत घटनास्थळी बोलवले.



तरुणाने व्हिडिओत म्हटलं आहे की, अनेकदा पोलिसांना फोन केल्यानंतर त्यांना फोन लागला. पोलीस आल्यानंतर तरुणाने म्हटले आहे, या लोकांना चांगलाच इंगा दाखवला पाहिजे. उद्या ते दुसऱ्या कोणासोबतही असंच बेशिस्त वर्तन करतील. पोलिसांनीही पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मात्र, आरोपीवर काय कारवाई करण्यात आली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. 


रशियन तरुणीच्या मित्राने म्हटलं आहे की, 7 नोव्हेंबर रोजी काही तांत्रिक समस्यामुळं तो या घटनेचा व्हिडिओ शेअर करु शकला नाही. हा व्हिडिओ शेअर करत त्याने प्रश्न उपस्थित केला आहे की, परदेशी महिला पर्यटक राजस्थानात सुरक्षित आहेत का? सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. लोक रशियन तरुणीसोबतच तिच्या मित्राने तिच्यासाठी आवाज उठवल्याबद्दल त्याचेही कौतुक करत आहेत.