Hanuman Chalisa Russian Girl: आपली मातृभाषा सोडली की, इतर भाषा बोलताना आपली बोबडी वळते. पण काही जण फर्राटेदारपणे इतर भाषा बोलतात. त्यांच्या बोलण्यात इतकी सहजता असते की त्यांची मातृभाषा ती भाषा आहे का? असा प्रश्न पडतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. यात एक छोटी रशियन मुलगी फर्राटेदार हिंदी बोलताना दिसत आहे. इतकंच नाही तर हनुमान चालीसा देखील मुखोद्गीत आहे. यूट्युबर गौतम खट्टर (Youtuber Gautam Khattar) यांनी सात वर्षीय क्रिस्टिनाचा (Kristina) इंटरव्ह्यू घेतला. त्यात तिची हिंदी ऐकून नेटकरी आवाक झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम खट्टर याने व्हिडीओ ट्वीट करत लिहिलं आहे की, "सात वर्षीय क्रिस्टिनानं भारतीय पालकांना आपली संस्कृती दाखवली आहे. आपल्या मुलांना इंग्रजी शिकवतात. दुसरीकडे या मुलीने भारतीय गुरकुलमध्ये शिकण्यासाठी रशिया सोडलं. भारतीयांना या लोकांकडून शिकायला हवं" तिने तिच्या बॅगेतून एक वही काढली तेव्हा खट्टरने क्रिस्टीनाला विचारले की, ही वही कसली आहे? तेव्हा तिने सांगितलं की, मंत्र लिहिण्यासाठी या वहीचा वापर केला आहे. त्यानंतर तिने डोळे मिटून हात जोडून हनुमान चालिसाचे पठण सुरू केले.



Mumbai Metro: मेट्रोत मुंगी घुसेल इतकीही जागा नव्हती, पण तो आला त्यानं पाहिलं आणि...! पाहा Video


मुलाखतीत क्रिस्टीनाने खुलासा केला की, देशात आल्यानंतर नुसती हिंदी भाषा शिकली नाही, तर हार्मोनियमच्या सुरात सूर मिसळले. त्याचबरोबर मंत्रांचाही सविस्तर अभ्यास केल्याचं सांगितलं.