रस्त्यावरचा बर्फ वितळून पिण्याची वेळ, भारतीय विद्यार्थ्यांची जगण्यासाठी धडपड
पाण्याच्या थेंबासाठी भारतीय विद्यार्थी धोक्यात घालतायत जीव, रस्त्यावरचा बर्फ वितळून पिण्याची वेळ, भारतीय विद्यार्थ्यांवर पाण्याच्या एक एक थेंबासाठी वणवण
रशिया-युक्रेन युद्धसंघर्षाचा गंभीर परिणाम तिथे शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही भोगावे लागले आहेत. युद्धादरम्यान त्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. युक्रेनच्या सुमी शहरातील विद्यापिठात 800 ते 900 भारतीय विद्यार्थी अडकलेत.
या भारतीय विद्यार्थ्यांचे अन्न पण्यावाचून या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. गेले काही दिवस या विद्यार्थ्यांवर अक्षरश: बर्फ वितळवून आपली तहान भागवण्याची वेळ आली आहे.
एका व्हिडीओद्वारे त्यांनी आपल्या सुटकेची मागणी केली. त्यानंतर आज त्यांना टँकरनं पाणी पुरवण्यात आलं.. मात्र उद्या पुन्हा पाणी मिळणार का याची चिंता या विद्यार्थ्यांना सतवत आहे. दररोज बाँबवर्षाव होत आहे.
त्यामुळे सारं काही बंद आहे. त्यातच कडाक्याची थंडी असल्याने अधिक हाल होत आहेत. खायला अन्नही नाही अशा स्थितीत आमचे मृतदेह व्हायच्या आत आम्हाला सोडवा अशी आर्त साद ही मुलं सरकारला घालत आहेत.