नवी दिल्ली: सचिन पायलट यांच्या नाराजी नाट्यामुळे सध्या राजस्थानमधील राजकारण Rajasthan crisis रंगतदार अवस्थेत पोहोचले आहे. आज सकाळीच दिल्लीत दाखल झालेल्या सचिन पायलट Sachin Pilot यांनी अजूनही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेतलेली नाही. राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांना चर्चेसाठी येण्याचा निरोप दिला होता. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही बैठक होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतलेली नाही. मात्र, राहुल गांधी यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरुन चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन पायलट यांच्यासाठी ज्योतिरादित्य सिंधियांचं ट्विट, म्हणाले...

परंतु, हे संकेत राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्यादृष्टीने चांगले नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यापूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशावेळीही असाच घटनाक्रम पाहायला मिळाला होता. त्यांनीही दिल्लीत येऊन काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेतली नव्हती. त्यामुळे आता सचिन पायलट हेदेखील ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पावलावर पाऊल ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



'घोडे तबेल्यातून पळाल्यावरच आपल्याला जाग येईल का?', कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला सवाल


या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत CM Gehlot यांनी आज रात्री काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आता किती आमदार उपस्थित राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण, सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे ३० आमदार आणि अपक्ष आमदार सचिन पायलट यांच्या संपर्कात आहेत. तुम्ही घ्याल तो निर्णय आपल्याला मान्य असल्याचे या आमदारांनी पायलट यांना सांगितल्याचे समजते. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरु असताना भाजपच्या गोटातून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजप अगदी शेवटपर्यंत या प्रकरणात गुप्तता पाळेल, असे दिसत आहे.