हॉलिवूड स्टार रिहानाला सचिन तेंडुलकरनं फटकारलं
शेतकरी आंदोलनाचे तीव्र प्रतिसाद
मुंबई : शेतकरी आंदोलनाबाबत ट्विटरवरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या हॉलिवूड स्टार रिहानाला सचिन तेंडुलकरनं फटकारलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पॉप स्टार रिहानासह अनेकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. भारताच्या खासगी प्रश्नावर अनेकांनी दखल देण्याचा प्रयत्न केला. मात्र बुधवारी सोशल मीडियावर ट्विट करत सचिन तेंडुलकरने साऱ्यांच तोंड बंद केलं आहे.
'भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होऊ शकत नाही. बाहेरच्यांनी प्रेक्षक म्हणून पाहावं, यामध्ये भाग घेऊ नये. तसेच भारताबाबत काय करायचं ते भारतीय ठरवतील, असा सल्ला सचिननं रिहानाला ट्विटरवरून दिला आहे. रिहानानं शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून ट्विटरवर काही सवाल उपस्थित केले होते.
भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होऊ शकत नसल्याचं सचिननं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. बाहेरच्यांनी प्रेक्षक म्हणून पाहावं, मात्र भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खपसू नये असंही सचिननं रिहानाला बजावलंय. भारताबाबत काय करायचं ते भारतीय ठरवतील असा सल्लाही सचिननं रिहानाला ट्विटरवरून दिला आहे.