नजर लागू नये म्हणून चिमुरडीच्या गळ्यात काळा दोरा बांधला... तोच गळफास ठरला
आपल्या लाडक्या लेकीला कोणाची वाईट नजर लागू नये आईने मोठ्या हौशेने लेकीच्या गळ्यात काळा दोरा बांधला, पण तोच दोरा लेकीच्या मृत्यूचं कारण ठरला. 5 वर्षांच्या भावाने आपल्या 9 वर्षांच्या बहिणीच्या मृतदेहाला दिला मुखाग्नी
Crime News : लहान मुलांना कोणाची वाईट नजर लागू नये यासाठी आई आपल्या बाळात काळा तीट लावते, गळ्यात किंवा मनगटात काळा दोरा बांधला जातो. पण याच दोऱ्याने एका चिमुरडीला जीव गमवावा लागला. गळ्या बांधलेल्या काळ्या दोऱ्यामुळए नऊ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. या घटनेने तिच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (9 years old girl died due to tied black thread)
काय आहे नेमकी घटना?
मध्यप्रदेशमधल्या (Madhya Pradesh) एसआर कॉलनी परिसरातील ही घटना आहे. आपल्या 9 वर्षांच्या मुलीला वाईट नजर लागू नये यासाठी तिच्या आईने तिच्या गळ्यात काळा दोरा (Black Thread) बांधला. पण तोच काळा दोरा मुलीचा जीव घेईल असं त्या माऊलीला वाटलं नव्हतं. सुनील अहिरवार हे पत्नी, 9 वर्षांची मुलगी सिमरन आणि मुलासोबतर एसआर कॉलनीत राहातात.
रविवारी दुपारी सिमरनची आई लहान मुलासह घरात झोपली होती. तर दुसऱ्या खोलीत सिमरन एकटीच खेळत होती. खेळताना तीने पलंगावर उभं राहून शॉलचा झोपाळा बनवण्याचा प्रयत्न करत होती, यासाठी तीने शॉलच्या सिलिंगला अडकवला पण शॉलचं दुसरं टोक तिच्या गळ्यातील दोऱ्यात घट्ट अडकलं, यामुळे सिमरनचा श्वास घुसमटला. सिमरनने ओरडण्याचा प्रयत्न केला पण दोरा गळ्याला घट्टा आवळला गेल्याने तिला ओरडताही येत नव्हतं.
काही वेळाळे सिमरनच्या आईला जाग आली. पण सिमरनच्या खेळण्याचा आवाज येत नसल्याने तीने बाजूला खोलीत जाऊन पाहिलं तर सिमरन जमीन निपचीत पडली होती. तिच्या गळ्ता शॉल आवळली गेली होती. सिमरन हालचाल करत नसल्याने घाबरलेल्या आईने तिच्या वडिलांना फोन करुन बोलावून घेतलं. दोघांनी तात्काळ सिमरनला रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारापूर्वीच सिमरनचा मृत्यू झाला होता. लाडक्या लेकीच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणाची पोलिसात नोंद करण्यात आली असून मृत्यूचं नेमंक्या कारणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.
शवविच्छेदन अहवालात सिमरनचा मृत्यू गळ्यातील काळा दोरा घट्ट आवळला गेल्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. सिमनरच्या मृतदेहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या 5 वर्षांच्या लहान भावाने आपल्या बहिणीच्या मृतदेहाला मुखाग्नी दिला.