नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणजेच 21 जून रोजी लोकसभा सचिवालयातर्फे ऑनलाईन योग सत्र आयोजित करण्यात आले आहे. या सत्रातील एका भागात भोपालच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकुर संबोधित करणार आहेत. साध्वी प्रज्ञा यांच्या संबोधनावरून कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. साध्वी प्रज्ञा यांनी नथूराम गोडसे बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी मोदी म्हणाले होते की, ते प्रज्ञांना कधीही मनापासून माफ नाही करणार.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा सचिवालयातर्फे ऑनलाईन योग कार्यक्रम चार सत्रांत विभागला आहे. त्यातील तिसरे सत्राला साध्वी प्रज्ञा संबोधित करणार आहेत. त्या सत्रात खासदारांना योगाच्या महत्वाबाबत संबोधित करतील.


परंतु या कार्यक्रमावर कॉग्रेसने आक्षेप घेतला आहे. कॉग्रेस खासदार मनिक्कम यांनी ट्वीट करीत विचारले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी साध्वी प्रज्ञा यांना मनापासून माफ केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवशी त्या सर्व खासदारांची प्रमुख पाहुणी असणार.  
या ट्वीटसोबतच त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा जूना व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी साध्वी प्रज्ञा यांना कधीही मनापासून माफ करणार नाही असे म्हटले आहे.