या शहरात हज हाऊसच्या भिंतींना भगवा रंग
या हज हाऊसच्या भिंतींना शुक्रवारी भगवा रंग देण्यात आला. या हज हाऊसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ या शहरातील बापू भवनासमोर हज हाऊस आहे. या हज हाऊसला आता भगवा रंग देण्यात आला आहे.
हज हाऊसच्या भिंतींना भगवा रंग
या हज हाऊसच्या भिंतींना शुक्रवारी भगवा रंग देण्यात आला. या हज हाऊसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अल्पसंख्याक कल्याण बोर्डाच्या वतीने
याआधी हज हाऊसच्या भिंती पांढऱ्या आणि हिरव्या रंगात रंगवण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार अल्पसंख्याक कल्याण बोर्डाच्या वतीने हज हाऊस रंगवण्यात आले.
इतर शहरांमध्येही इमारतींना भगवा रंग
लखनऊमध्येच नाही तर राज्यातल्या इतर शहरांमध्येही इमारतींना भगवा रंग दिलेला बघायला मिळतो आहे. डिसेंबर महिन्यात पीलभीत या ठिकाणी असलेल्या १०० पेक्षा जास्त शाळांना भगवा रंग देण्यात आला.
आदित्यनाथ यांच्या कार्यालयाला यापूर्वीच भगवा
शिक्षकांनी केलेला विरोध झुगारून हा रंग देण्यात आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या कार्यालयाला भगवा रंग दिला.