नवी दिल्ली : Coronavirusचा प्रादुर्भाव पाहता वेळीच भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. सर्वच राज्यांनी या ल़ॉकडाऊनचा पाठिंबा दिला. या काळात बहुतांश उद्योगधंदे, वाहतूक, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. किंबहुना सातत्यानं पर्यावरणाची जाणते आणि अजाणतेपणे आपल्या कृतींतून होणारी हानीसुद्धा बऱ्याच अंशी कमी झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनच्या या काळात दैनंदिन राहणीमानात काही बदल घडून आलेले असतातनाच तिथे निसर्गानेही आपली किमया दाखवण्यास सुरुवात केली. मोठ्या कालावधीसाठी वाहनं आणि मानवी कृतींतून होणाऱ्या प्रदुषणाची पातळीही घटल्यामुळे नद्यांचं पाणी आपोआपच स्वच्छ झाल्याचं पाहायला मिळालं. पंजाबमधून धौलाधर बर्फाच्छादित पर्वतरांगांचं दर्शन घडलं. 


आता तर, म्हणे उत्तर प्रदेशातील सहारनपूर भागातून थेट हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतशिखरं दिसू लागली आहेत. गढवाल हिमालयाच्या या पर्वतरांगा सध्या या ठिकणी अनेकांना थक्क करत आहेत.


जवळपास २०० किलोमीटरहूनही अधिक अंतरावर असणाऱ्या या विस्तीर्ण आणि अद्वितीय अशा पर्वतरांगा सहपणे दिसू लागल्याचं लक्षात येताच सोशल मीडियावर  काही स्थानिकांनी या क्षणीचे फोटो पोस्ट केले. 




 


आयएफएस अर्थात भारतीय वन विभागामध्ये सेवेत असणाऱ्या रमेश पांडे यांनीही सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये या बर्फाच्छादित पर्वतरांगा अगदी सहजपणे दिसत आहेत. बंदारपूँछ, गंगोत्री अशी हिमालयाची ही अंतर्गत पर्वतशिखरं दिसत असल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. मुळात सहारनपूरमध्ये यापूर्वी असं दृश्य कधीच पाहिलं नव्हतं. मसूरीमधून हे दृश्य अनेकदा दिसतंही. पण, इथे ही शिखरं दिसणं म्हणजे अविश्वसनीयच.... अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.