Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी नागरिक असून त्याचे नाव शरीफुल इस्लाम शहजाद असं आहे. पोलिसांनी त्याला काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे. तर या प्रकरणात आता पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका महिलेला अटक केली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पोलिसांनी पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात तपासकार्याला सुरुवात केली होती. त्यानंतर या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी मुंबई पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगालमध्ये गेलं होतं. त्यानंतर नदिया जिल्ह्यातील छपरातून या महिलेला अटक करण्यात आली होती. या महिलेचे नाव खुखुमोनी जहांगीर शेख असं आहे. पोलिसांनी या महिलेला बंगालमधून मुंबईला आणण्यासाठी ट्रांजिस्ट रिमांडसाठी अर्ज करणार आहे. 


पीटीआयने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीफुल जे सिमकार्ड वापरत होता ते याच महिलेच्या नावावर रजिस्टर होते. तसंच, शरीफुल सिलीगुडजवळ भारत-बांगलादेशच्या सीमेजवळून भारतात घुसखोरी केली होती. त्यानंतर तो या महिलेच्या संपर्कात आला होता. महिला पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या अंदुलिया येथील राहणारी आहे. 


मुंबई पोलिसांनी या महिलेचा जबाब नोंदवला आहे. आत्तापर्यंतच्या तपासात पोलिसांना या महिलेचा सैफ अली खान हल्ल्या प्रकरणात काही हात नसेल असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या महिलेने अवैधरित्या आरोपीला सिम कार्ड पुरवलं होतं. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी या महिलेला चौकशीसाठी बोलवलं आहे. 


कधी झाला सैफ अली खानवर हल्ला?


सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्याच्या जबरी वार करण्यात आले होते. लिलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रियादेखील पार पडली होती. या प्रकरणात पोलिसांनी ठाण्यातील कासारवडवली येथून एका आरोपीला अटक केले. मात्र हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्यामुळं या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट समोर आला आहे. त्यामुळं या आरोपीला मदत केलेल्या महिलेलादेखील पोलिसांनी शोधून काढले आहे.