नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला बसलेल्या राजकीय भूकंपानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दीन सोज यांचं एक विधान वादाचा विषय ठरलंय. सैफुद्दीन सोज यांनी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या एका जुन्या विधानाचं समर्थन केलंय... या विधानात मुशर्रफ यांनी 'जर काश्मीरींना संधी मिळाली तर ते कुणासोबत जाण्यापेक्षा स्वतंत्र होणं पसंत करतील' असं म्हटलं होतं... सोज यांच्या म्हणण्यानुसार, मुशर्रफ यांनी एका दशकापूर्वी केलेलं हे विधान आजही अनेक अर्थांनी चपखल बसतं. परंतु, यानंतर हे आपलं वैयक्तिक मत असून याच्याशी पक्षाचं काहीही देणं-घेणं नसल्याचंही स्पष्ट केलं. आत्ताच्या परिस्थितीत काश्मीर स्वातंत्र्य मिळणं शक्य नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूपीए सरकारमध्ये मंत्रीपदावर असलेले काँग्रेस नेते सोज यांनी आपल्या पुस्तकात केंद्र सरकारला हुर्रियत नेत्यांसोबत खुलेपणानं चर्चा करण्याचाही सल्ला दिलाय. सोज यांचं काश्मीर मुद्यावर 'काश्मीर: ग्लिम्प्स ऑफ हिस्टरी अॅन्ड द स्टोरी ऑफ स्ट्रगल' हे पुस्तक येत्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. 


सोज यांच्या म्हणण्यानुसार, १८९५३ पासून आजपर्यंत देशात जेवढे सरकार आलेत त्यांनी काश्मीरच्या मुद्यावर काही ना काही चूक केलीय. मग त नेहरुंचं सरकार असो किंवा इंदिरा गांधींचं... 


केंद्राला काश्मीरचा प्रश्न सोडवायचा असेल तर तिथं असं वातावरण बनवणं आवश्यक आहे ज्यामध्ये काश्मीरी सुरक्षित अनुभव घेऊ शकतील... आणि चर्चेसाठी तयार होतील, असंही सोज यांनी म्हटलंय.