1 ऑक्टोबरपासून पगार आणि बँक सेवांमध्ये होणार बदल; आजच पाहा काय असतील परिणाम
सॅलरी स्ट्रक्चर बदलणार
नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून आर्थिक सुविधांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. या दिवसापासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीम लागू होणार आहे. ज्याअंतर्गत बँक आणि Paytm-Phonepe सारखे डिजिटल प्लॅटफॉर्मही इन्स्टॉलमेंट किंवा कोणत्याही प्रकारचं बिल भरण्यासाठी पैसे डेबिट करण्यापूर्वी सर्वप्रथन तुमची परवानगी घ्याली लागेल.
सॅलरी स्ट्रक्चर बदलणार
नव्या वेतन नियमानुसार चर्मचाऱ्यांच्या वेतन प्रणालीत बदल येणार आहे. (New Wage Code Salary Structure) ज्याचा परिणाम Take Home Salary वर होणार असून, ती कमी होणार असल्याची चिन्हं आहेत. वेज कोड एक्ट (Wage Code Act), 2019 च्या नुसार कोणत्याही कर्मचाऱ्य़ाचं मूळ वेतन हे Cost To Company-CTC च्या 50 टक्क्यांहून रमी नसावी. सध्या अनेक कंपन्यांकडून मूळ वेतन कमी ठेवत त्यावरील भत्ते मोठ्या प्रमाणात देम्यात येतात. परंतु या साऱ्याचे नियम 1 ऑक्टोबरपासून बदलणार आहेत.
ट्रेंडिंग अकाऊंट केवायसी नियम
सिक्योरिटी एंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) नं आधी ट्रेंडिंग अकाऊंट इन्वेस्टर्ससाठी केवायसी अनिवार्य केलं होतं. यापूर्वी याची अखेरची तारीख 31 जुलै होती. पण आता मात्र ही तारीख 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. यामध्ये पत्ता, नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, इनकम रेंज यांचा समावेश आहे.
1 ऑक्टोबरपासून डेबिच पेमेंटमध्ये येणार अडथळे
RBI नं डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी Additional Factor Authentication (AFA) लागू करण्य़ाचे निर्देश दिले आहेत. ही प्रक्रिया ओटीपीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. आरबीआयच्या नियमांनुसार बँकांनाही ऑटो पेमेंटपूर्वी ग्राहकांना नोटिफिकेशन द्यावं लागणार आहे.