मुंबई : नोकरदारांना काहीसा दिलासा देणारी ही बातमी आहे. 1 एप्रिलपासून तुमच्या हातात येणारा पगार हा कमी येणार, अशी काही दिवसांपासून शक्यता वर्तवली जात होती. त्याला कारणही तसेच होते. कारण केंद्र सरकार सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल करणार असल्याचे बोलले जात होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तसे होणार नाही आहे. सध्या तरी या सॅलरी स्ट्रक्चरमधील बदलाबाबद केंद्र सरकारचा विचारविनिमय सुरू आहे. त्यामुळे तूर्तास तरी तुमच्या हातात आधीप्रमाणेच पगार येणार आहे.


केंद्र सरकार काय बदल करणार होती?


कर्मचाऱ्यांना त्यांच्या CTC मधील 50 टक्के रक्कम बेसिक आणि 50 टक्के रक्कम भत्ता स्वरूपात मिळेल. पण ज्यांच्या सीटीसीनुसार एकूण पगाराची 50 टक्के रक्कम आधीच बेसिक आहे, त्यांच्यावर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाहीये.


मात्र ज्यांची बेसिक सॅलरी एकूण रक्कमेच्या 30 ते 40 टक्के आहे, त्यांना मिळणाऱ्या पगारावर याचा परिणाम होणार आहे.


संसदेत हे विधेयक मंजूरही झाले आहे, आणि त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरीही झाली आहे. मात्र हा नियम लागू करण्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा न झाल्याने तूर्तास तरी नोकरदारांना दिलासा मिळालेला आहे.