Salil Parekh Salary Hike:  अलीकडेच, इन्फोसिसच्या बोर्डाने पुन्हा एकदा सलील एस. पारेख यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (CEO आणि MD) म्हणून नियुक्ती केली आहे. आता ते 1 जुलै 2022 ते 31 मार्च 2027 या कालावधीत या पदावर राहतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांच्या पगारात यंदा मोठी वाढ झाली आहे. सलील पारेख यांचे वेतन पॅकेज वार्षिक 49 कोटींवरून 71.02 कोटी रुपये झाले आहे. पारेख यांच्या पगारात तब्बल 43 टक्के वाढ झाली आहे.



सीईओच्या पगारात झालेल्या वाढीनंतर सॉफ्टवेअर कंपनीने सांगितले की, सलील यांच्या नेतृत्वाखाली इन्फोसिसने मोठी प्रगती केली आहे. सलील पारेख यांचा कार्यकाळ 5 वर्षांनी वाढवण्याच्या घोषणेनंतर त्यांच्या पगारात वाढ करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.


सलील पारेख यांच्या नेतृत्वाखाली कंपनी मजबूत


गुरुवारी जाहीर झालेल्या इन्फोसिसच्या वार्षिक अहवालात सीईओ सलील पारेख यांच्या पगारात वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. इन्फोसिसने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सलील पारेख यांच्या नेतृत्वाखाली कंपनी अधिक मजबूत झाली आहे.


इन्फोसिसने अलीकडेच पुढील 5 वर्षांसाठी व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि CEO पदासाठी सलील पारेख यांची पुनर्नियुक्ती केली आहे. सलील पारेख यांचा नवीन कार्यकाळ 1 जुलै 2022 ते 31 मार्च 2027 पर्यंत असेल.


सलील पारेख यांचा 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव


सलील पारेख यांना IT उद्योगात 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. सलील पारेख यांनी जानेवारी 2018 मध्ये इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. इन्फोसिसमध्ये रुजू होण्यापूर्वी सलील पारेख कॅपजेमिनीशी 25 वर्षे संबंधित होते.


इन्फोसिसने गेल्या महिन्यातच चौथ्या तिमाहीचे निकाल सादर केले होते. चौथ्या तिमाहीत कंपनीने 5,686 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 12 टक्के अधिक आहे. मात्र, तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 2 टक्क्यांनी घट झाली आहे.