जोधपूर : जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला २ वर्षांची शिक्षा सुनावली किंवा नाही. याबाबत संभ्रम आहे, कारण सरकारी वकिलांनी कोर्टाच्या बाहेर येऊन मीडियाशी बोलताना सांगितलं की, सलमान खानला नेमकी किती दिवस शिक्षा दिली जाणार आहे किंवा नाही. याबाबतीत अजून कोर्टाने निर्णय दिलेला नाही. हा निर्णय कोर्टाच्या दुपारच्या जेवणाच्या सुटीनंतर सुनावला जाणार आहे. 


सलमानला २ वर्षाच्या शिक्षेची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानला सरकारी वकिलांनी २ वर्षाच्या शिक्षेची मागणी केली असल्याचं सांगण्यात येत आहे, जर सलमानला ३ वर्षापेक्षा कमी शिक्षा मिळाली तर, सलमान खानला जामीनासाठी त्याच कोर्टात अर्ज करता येतो. सुनावलेल्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी सलमानला १ महिन्याची मुदत देखील मिळणार आहे, पण जर सलमान ३ वर्षापेक्षा कमी शिक्षा सुनावली तर, मात्र सलमानला ३ वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली, तर सलमान खानसाठी जेलची वारी अटळ आहे.


सलमानसाठी बहिणी रडल्या


 सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची बहिण अलबिराला रडू आल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानच्या बहिणी त्यांच्या विषयी अधिक भावनिक आहेत. आज सलमानबरोबर बहिणी दिसल्या, पण भाऊ दिसत नव्हते, पण एकूणच सलमान खानला मोठा दिलासा आहे.