अ‍हमदाबाद : महाराष्ट्रात घोड्यांचा खास बाजार आणि शर्यती रंगतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक दर्जेदार घोड्यांना विकत घेण्यासाठी लाखो-करोंडोंची उलाढाल होत असते. सध्या अशाच एका जातिवंत घोड्याला विकत घेण्यासाठी राजकारण्यांपासून सेलिब्रिटींनी करोडोंची बोली लावली आहे.  


कोणता आहे हा घोडा ? 


सकब नावाचा मोहम्मद पैगंबरांचा घोड्याचा मालकी हक्क सिराज खान पठाण यांच्याकडे आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिराज पठाण यांनी वर्षभरापूर्वी 1.11 कोटींना या घोड्याला विकत घेतले. 


खास आणि जातिवंत असलेल्या या घोड्याला विकत घेण्यासाठी नुकतीच सलमान खानने 2 कोटींची बोली लावली होती. मात्र सलमानसह अनेकांनी कोट्यांची रक्कम ऑफर करूनही सिराजने हा प्रस्ताव नाकारला आहे.


इतके खास काय आहे ?


सकब हा सहा वर्षांचा दुर्मिळ प्रजातीचा घोडा आहे. 
सकब 43 किलोमीटर वेगाने धावतो. 
अमेरिका आणि कॅनडामध्ये असणारे दोन जातिवंत घोडेच या घोड्याच्या वेगासोबत स्पर्धा करू शकतात. 
सकबने राष्ट्रीय स्तरावर आजपर्यंत 19 स्पर्धा जिंकल्या आहेत. 
सकबचा एक डोळा पांढरा आणि एक डोळा काळा आहे. यामुळे तो अशुभ मानला जातो.