लखनऊ : नागरिकता संशोधन कायद्या विरोधात देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील याचे पडसाद उमटले असून या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलना दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना समाजवादी पार्टी जाऊन भेटत आहे. यावेळी त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजवादी पार्टीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आहे. संविधान वाचविण्यासाठी सीएए-एनआरसी विरोधी आंदोलना दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये देण्यात येतील असे यात लिहीले आहे.



समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लखनऊमध्ये सीएएच्या विरोधात आंदोलन करताना मृत्यूमुखी पडलेल्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. ज्याप्रमाणे इंजिनिअरच्या हत्येनंतर त्याच्या परिवाराला घर आणि नोकरी दिली होती. त्याप्रमाणे या परिवाराला देखील घर आणि नोकरी दिली जावी असे ते म्हणाले. 



सरकार या दोघांमध्ये फरक का करत आहे ? या संपूर्ण प्रकाराच्या चौकशी मागणी देखील अखिलेश यादव यांनी केली आहे.



समाजवादी पार्टीतर्फे शक्य होईल तितकी मदत करण्याचे आश्वासन अखिलेश यादव यांनी दिले आहे.