Railway Food: समोसाप्रेमींसाठी (Samosa) एक महत्त्वाची बातमी...जर तुम्ही समोसा खाण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. आपण अनेक वेळा रेल्वे प्रवासादरम्यान IRCTC पॅंट्रीमधून (IRCTC Pantry) जेवण किंवा इतर नाश्ताचे पदार्थ ऑर्डर (Railway Food Order) करतो. अनेकांना घरून जेवण घेणं शक्य नसतं किंवा लांब पल्ल्याच्या (Indian Railways) प्रवासात घरातून आणलेले अन्न चांगलं राहतं नाही. अशात अनेक लोक IRCTC पॅंट्रीचा उपयोग करता. पण याच IRCTC पॅंट्रीचा धक्कादायक अनुभव (Experience) रेल्वेने (Railway) प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला आला आहे. 


समोसा खाताना सावधान!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईहून लखनौला (Mumbai to Lucknow) जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशासोबत एक विचित्र घटना घडली आहे. या प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरही आपला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. घडलं असं की, हा प्रवासी प्रवासादरम्यान IRCTC पॅंट्रीमधून एक समोसा विकत घेतो. ज्यावेळी तो हा समोसा खायला जातो त्याला धक्काच बसतो. कारण या समोसातून एक पिवळ्या रंगाचा कागद निघतो. अजी कुमार (Aji Kumar)  असं या प्रवाशाचं नाव असून 9 ऑक्टोबरला त्याचासोबत ही घटना घडली. (samosa Railway Food IRCTC nmp) सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल  (Viral) होत आहे. 



हे ट्विट (Tweet) व्हायरल झाल्यानंतर IRCTC ने या प्रकरणात हस्तक्षेप करत प्रतिक्रिया दिली आहे. एवढेच नाही तर या घटनेमुळे झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वेने खेदही व्यक्त केला आहे. याशिवाय प्रवाशाला पीएनआर (PNR) नंबर आणि मोबाईल नंबर डायरेक्ट मेसेजद्वारे शेअर करण्यास सांगितले आहे. 



या घटनेची माहिती मिळताच लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर काही लोक संतापताना दिसले, तर काहींनी गंमतीने हे प्रकरण टाळले. या प्रकरणात एक चांगली गोष्ट म्हणजे IRCTC ने याबद्दल खेद व्यक्त केला आहे.