Samosa Video Viral  : पाणी पुरी, डोसा, वडापाव आणि समोसा (samosa) अशा पदार्थांची नावं घेताच तोंडाला पाणी सुटतं. समोसाला तर राजा म्हटलं जाते. मसालेदार बटाट्याचे सारण भरलेले गरम गरम समोसे खाय्यला सर्वांनाचं आवडते. समोसे आणि त्यासोबत चटणी हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. पण माध्यमे आणि इंटरनेटच्या माध्यमातून हे रस्त्यावरचे खाद्यपदार्थ अत्यंत घाणेरडे पद्धतीने तयार होत असल्याचे नेहमीच व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओमुळे कुठेही स्ट्रीट फूड खाण्याची भीती वाटते. आता पुन्हा एकदा एक विचित्र व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता, एका रेस्टॉरंटमधील कर्मचारी पायाने बटाटे धुताना दिसत आहे. येथे कोणीही स्वच्छता राखताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा एक भीषण उदाहरण समोर आले आहे. अनेकदा अनेकजण शॉर्टकट वापरून लोकांच्या जीवाशी खेळताना दिसतात. असा एक प्रकार आता या व्हिडिओतून सामोर आला आहे. तयार केलेल्या चांगल्या मशिनरीचे विक्रेते अत्यंत घाणेरड्या पद्धतीने समस्यांसाठी हात चोळताना दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा लोकांची झोप उडाली आहे. 


नेमकं प्रकरण काय?


हा व्हायरल व्हिडीओ  मध्य प्रदेशातील सतना येथील असून एका रेस्टॉरंटमधील कर्मचारी पायाने बटाटे धुताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच अन्न आणि औषध विभागाचे अधिकारी रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. त्यांनी अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. या प्रकरणावर रेस्टॉरंटच्या मालकाचे म्हणणे आहे की,  हा व्हिडिओ 4 महिन्यांचा आहे. त्यांनी त्या कर्मचाऱ्याला आधीच काढून टाकले आहे. तसेच कर्मचारी नीट काम करत नाही म्हणून त्यांला शिवीगाळ केली. याच गोष्टीचा राग काढत त्या कर्मचाऱ्यांने बटाटे पायाने धुतले. हा व्हिडिओही त्यांनी पाहिला. त्यामुळे त्यांनी त्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकले.



त्याचवेळी पायांनी बटाटे धुत असतानाच्या या व्हायरल व्हिडिओने परिसरात खळबळ उडाली आहे. अलीकडेच काही स्थानिक लोक या रेस्टॉरंटला विरोध दर्शवित आहेत. तर  दुसरीकडे अन्न सुरक्षा अधिकारी अभिषेक बिहारी गौर यांनी सांगितले की, त्यांनी मैदा यांसारख्या उपाहारगृहातील वस्तूंचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.