ब्रेक फास्ट पे चर्चा : संजय राऊत आणि राहुल गांधींच्या या फोटोची चर्चा
शिवसेनेची राष्ट्रवादी नंतर आता काँग्रेस सोबत ही जवळीक वाढत आहे का?
नवी दिल्ली : महाविकासआघाडी सरकार राज्यात स्थापन करण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका होती. ते शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या खूप जवळचे मानले जातात. राहुल गांधी हे लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ही गोष्ट संजय राऊत यांना कदाचित इतर काँग्रेस नेत्यांच्या आधीच माहिती झाली असावी.
राहुल गांधी यांनी आज भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते. दिल्लीत झालेल्या या बैठकीत अनेक मोठे नेते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात ही भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे संजय राऊत चर्चेत आहेत. भाजप सोबत अनेक दिवस युतीमध्ये असलेली शिवसेना आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जवळ जात आहे.
काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आजच्या बैठकीतले काही फोटो शेअर केले आहेत.
आजच्या ब्रेक फास्ट मीटिंगमध्ये संजय राऊत आणि राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. राहुल गांधी संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या सोबत बोलत आहेत.
आजच्या या बैठकीत जवळपास 100 खासदार उपस्थित होते. पण हा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.