संत निरंकारी मिशनच्या माता सविंदर यांचं निधन
निरंकारी मिशनच्या लाखो अनुयायांसाठी दु:खाची बातमी
नवी दिल्ली : संत निरंकारी मिशनच्या सविंदर हरदेव महाराज यांचं रविवारी दीर्घ आजारामुळे निधन झालं. रविवारी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांचं दिल्लीतील बुराडीमध्ये निधन झालं. निरंकारी कॉलनी येथे ते राहत होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
माता सविंदर यांनी 17 जुलैला मिशनच्या सहाव्या सद्गुरुच्या रुपात त्यांची लहान मुलगी सुदीक्षा यांच्या हातात या मिशनची जबाबदारी सोपवली होती. माता सविंदर यांनी म्हटलं होतं की, अजुनही बाबा हरदेव महाराज यांच्या इच्छेनुसार खूप काही करायचं बाकी आहे. सुदीक्षा आता ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जबाबदारी घेईल. माता सविंदर हरदेव महाराज संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुखच्या रुपात 13 मे 2016 ते 16 जुलै 2018 पर्यंत राहिल्या.
कोण होते बाबा हरदेव
बाबा हरदेव सिंह यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1954 मध्ये दिल्लीमध्ये झाला होता. 1980 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी निरंकारी मिशनची जबाबदारी घेतली. याआधी 1971 मध्ये निरंकारी सेवा दलमध्ये ते सहभागी झाले होते. 1975 मध्ये त्यांनी फर्रुखाबाद येथे सविंदर कौर यांच्याशी विवाह केला होता.
1929 मध्ये निरंकारी मिशनची स्थापना
संत निरंकारी मिशनची स्थापना 1929 मध्ये झाली होती. हे मिशन 27 देशांमध्ये सुरु आहे. भारतात जवळपास प्रत्येक राज्यात त्यांचे अनुयायी आहेत. बाबा हरदेव सिंह यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने देखील त्यांचा सन्मान केला आहे.