मुंबई : जबरदस्त जाहिरात करणारा साबणाचा ब्रॅंड लक्सचे बाजारातील स्थान घसरताना दिसत आहे. भारतीय साबण बाजारात लक्सचे स्थान घसरुन तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. विप्रो कंज्युमर केअर अॅँड लायटिंगचा ब्रॅंड संतूरने लक्सला मागे टाकले आहे. संतूर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर हिंदुस्तान युनिलिव्हरचा सर्वात लोकप्रिय साबण लाईफबॉयने या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. रिसर्च फर्म केंटार आयएमआरबी हाऊसहोल्ड पॅनलच्या माहितीनुसार, संतूर आता देशातील दुसरा सर्वात मोठा ब्रॅंड बनला आहे. तर पहिला नंबर लाईफबॉयचा आहे. 


सर्वात लोकप्रिय ब्रॅंड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंतार वर्ल्डपॅनल डेटानुसार, यापूर्वी लक्स दुसऱ्या स्थानावर होता. जुनमध्ये संतूरचे वॉल्यूम शेअर 14.9% होते तर लक्सचे वॉल्यूम शेअर 13.9% होते. एचयुएलच्या लाईफबॉयचे वॉल्यूम शेअर 18.7% असल्याने तो देशातील सर्वात लोकप्रिय ब्रॅंड बनला. 


असे मिळवले यश


इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, विप्रो कंज्युमर केअरचे सीईओ अनिल चुघने सांगितले की, संतूर आता वॉल्यूम शेअरनुसार, देशातील दुसरा सर्वात मोठा ब्रॅंड बनला आहे. डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क वाढवून, योग्य जाहिराती आणि नवी वेरिएंट्सच्या माध्यमातून संतूरने हे यश संपादित केले आहे. तरुणांसाठी नवे व्हर्जन्स लॉन्ज केले जे त्यांना भावले. आर्थिक वर्ष २०१७-२०१८ मध्ये संतूरची विक्री १,९३० कोटी रुपये होती. संतूर दक्षिण आणि पश्चिमी भारतात सर्वात मोठा ब्रॅंड ठरला होता. पण पहिल्यांदा संपूर्ण देशभरात संतूरचे स्थान उंचावले. 



गुजरातच्या ग्रामीण भागात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्‍ट्रात संतूर पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनीच्या नफ्यात भारताचे योगदान ५०% आहे. सिंगापूरमध्ये उंझा होल्डिंग्स, ब्रिटेनमध्ये यार्डली, सिंगापूर बेस्ड स्किन केअर कंपनी एलडी वॅक्सन आणि चीनमध्ये झोंगशान सहीत खूप सारे ब्रॅंड्स खरेदी केले आहेत. त्याचबरोबर विप्रो कंज्यूमरने डोमेस्टिक ऑनलाईन कंज्यूमर प्रॉडक्ट्स फर्म हॅपेली अनमॅरिड मार्केटिंगमध्ये छोटीशी भागीदारी खरेदी केली आहे. 


यांनी केली लक्सची जाहिरात


वॉल्युम शेअरमध्ये एचयुएलचा लक्स आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. एचयुएलच्या प्रवक्तांनी सांगितले की, लक्सची ग्रोथची गेल्या वर्षी चांगली होती. लाईफबॉयनंतर हा देशातील दुसरा सर्वात मोठा ब्रॅंड होता. ऐश्‍वर्या, करीना, कतरिना, हेलेन, आलिया, माधुरी, प्र‍ियंका यांसारखे बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींनी लक्सची जाहिरात केली आहे. 


लाईफबॉय देशात नंबर वन


इंग्लंडची कंपनी युनिलिव्हर लाईफबॉयची निर्मिती करते. हे उत्पादन इंग्लंडमध्ये १८९५ मध्ये बनले होते. भारतात हे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड नावाने व्यापार करतात याचा 67% नफा थेट इंग्लंडला जातो. 
जून २०१८ मध्ये सलग तिसऱ्या तिमाहीत यात एचयुएलने सेल्स वॉल्यूममध्ये ग्रोथ प्राप्त केली. कंपनीने जून क्वॉर्टरमध्ये पर्सनल केअर बिजनेसपर्यंत 1% वाढीसह 4,096 कोटी रुपये झाली. कंपनीच्या एकूण नफ्यात पर्सनल केअर सेगमेंटचे योगदान होते.