मुंबई : देशाच्या समृद्धीमध्ये आणि 'अमृत काल'पर्यंत भारताच्या विकासाला गती देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs) महत्वाची भूमिका बजावतात. आज, एमएसएमई क्षेत्र हे नवीन नोकऱ्यांसाठी दुसरा सर्वात मोठा मोठे स्त्रोत आहे. एमएसएमईद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं. देशाच्या जीडीपीमध्ये याच MSME चा सुमारे एक तृतीयांश वाटा आहे. यामुळे एमएसएमईला भारताचं ग्रोथ इंजिन मानलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SAP Dare to Dream Awards 2022 च्या माध्यमातून 'डिजिटल मानसिकता' (Digital Mindset) चा वापर करत MSME हिरोंचा सन्मान केला जाणार आहे. अनिश्चित भविष्यात वाटचाल करताना, सकारात्मक सामाजिक-आर्थिक प्रभाव वाढवणे, व्यवसायाच्या नवनव्या संधी शोधणे, हा यामागील मुख्य हेतू आहे. हे पुरस्कार झी बिझनेसच्या संयुक्त विद्यमाने प्रदान केले जाणार आहेत. यामधून SME इकोसिस्टमला अधिक बळकटी आणि प्रेरणा प्रदान होईल अशी अपेक्षा आहे.


पाहा व्हिडिओ... 



कुलमीत बावा (President & Managing Director, SAP Indian Subcontinent, SAP) याबाबत म्हणाले...


"भारतातील SAP चा प्रवास नेहमीच राष्ट्र-निर्माण कार्यक्रमांशी संरेखित केला गेला आहे. याचा 300 दशलक्षाहून अधिक भारतीयांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला आहे. भारतातील मध्यम स्वरूपाचे व्यवसाय आणि आणि देशाच्या विकासाला चालना देण्यावर आमचा नेहमी विश्वास असतो. यामध्ये भविष्यातील कार्यबल विकसित करण्यासाठी SAP तंत्रज्ञान भागीदार म्हणून काम करत असतो. SME समुदायाचा विश्वासू सल्लागार किंवा देशाच्या नवकल्पना परिसंस्थेला चालना देण्यासाठीही आम्ही कायम कार्यरत आहोत. या पुरस्कारांच्या माध्यमातून भारताला विकासाकडे नेणाऱ्या सर्व व्यावसायिक नायकांची ओळख करून घेणं आणि त्यांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे."


गेल्या काही वर्षांमध्ये, तंत्रज्ञानाचा वापर करत, आपल्या नवनव्या संकल्पनांच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत आव्हानांचा सामना करत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यावसायिकांसाठी यंदाचं "डेअर टू ड्रीम अवॉर्ड्स"चे हे चौथे पर्व आहे. यामाध्यमातून भारतीय व्यावसायिकांच्या कठोर परिश्रमांचा सन्मान केला जाईल.


मिडमार्केट आणि इमर्जिंग बिझनेसचे उपाध्यक्ष राजीव सिंग याबाबत म्हणतात की....


"भारतीय एमएसएमई आणि संबंधित व्यवसायिकांमध्ये केवळ भारताच्या अर्थव्यवस्थेलाच नव्हे तर अब्जावधी भारतीयांच्या जीवनातही परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. भारताच्या GDP मध्ये त्यांचा एकूण 27% वाटा आहे, जे अतिशय महत्त्वाचं ठरतं. भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना, नवीन भारताच्या आणि भविष्यातील मोठ्या झेपेसाठी सज्ज आहोत."


या वर्षाची थीम ही "पुढील मोठी झेप" असणार आहे. यामध्ये एकाच छताखाली बडे उद्योजक, विचारवंत, नेते आणि व्यवसाय क्षेत्रातील इतर अनुभवी एकत्र येणार आहेत. येत्या 16 नोव्हेंबर 2022 ला मुंबईतील ताज लँड्सएंड येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. या वर्षीच्या आवृत्तीतील व्याख्यानं, पॅनल डिस्कशन किंवा होणाऱ्या चर्चा 2047 मधील भारताबाबतच्या संकल्पना अधोरेखित करणाऱ्या असतील असेही राजीव सिंग म्हणाले.


काय म्हणाले अनिल सिंघवी?


"भारताला इंडियाशी जोडण्यात महत्त्वाचा दुवा म्हणजे एमएसएमई क्षेत्र, मात्र भारताच्या या यशोगाथेबाबत फारसं बोललं जात नाही. SAP च्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला डेअर टू ड्रीम हा उपक्रम हा याचाचा एक उत्तम पुरावा आहे. रोजगारनिर्मिती आणि उद्योजकता, याद्वारे लाखो भारतीयांना सशक्त बनवणाऱ्या या असाधारण यशोगाथा इथे आपल्याला जाणून घेता येणार आहेत. यामाध्यमातून विविध 12 श्रेणींमध्ये 50 पेक्षा अधिक जणांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. यामधील ज्युरी मेंबर हे तंत्रज्ञान, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि व्यापारात नाविन्यता आणण्यासाठी ओळखले जातात.


डेअर टू ड्रीम अवॉर्ड्सच्या माध्यमातून व्यवसायात नाविन्यता आणि इतरांना प्रेरणा देणाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे तुम्हीही जर असे इन्होवेटर असाल तर स्वतःला जगासमोर आणण्याची हीच ती वेळ. यामाध्यमातून तुम्ही तुमचा प्रवास जगासमोर आणू शकतात आणि सोबतच जगासमोर एक उत्तम उदाहरण ठेवू शकतात. इथे भरा नमिनेशन फॉर्म. -  डेअर टू ड्रीम पुरस्कारांच्या संकेतस्थळाला भेट द्या


चला तर मग, तुमचा प्रेरणादायी प्रवास जगासोबत शेअर करण्याची आणि तुमच्या व्यवसायासाठीचे नवे आयाम निर्धारित करण्यासाठीची हीच ती वेळ. नामांकन प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डेअर टू ड्रीम अवॉर्ड्स 2022 वेबसाइटला भेट द्या आणि नावीन्यपूर्ण या सेलिब्रेशनचा एक भाग होण्यासाठी 29 ऑक्टोबरपूर्वी तुमची नामांकने भरा.


SAP बद्दल...


प्रत्येक व्यवसायाला शाश्वत आणि अत्याधुनिक एंटरप्राइझ म्हणून चालवण्यास मदत करणे हे SAP चं धोरण आहे. जगातील एकूण जागतिक व्यापारापैकी 87% व्यवसाय हे SAP प्रणालीचा वापर करतात. या माध्यमातून कंपन्यांना उत्तमोत्तम रित्या चालवण्यास मदत केली जाते. SAP मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), आणि ऍडव्हान्स ऍनालिटिक्सचा वापर करून व्यवसायांना सस्टेनेबल एंटरप्रायझेसकडे वाटचाल करण्यास मदत केली जाते. SAP च्या माध्यमातून संस्थांना स्पर्धेच्या युगात पुढे राहण्यास देखील मदत होते. SAP च्या माध्यमातून कंपन्यांसाठी तंत्रज्ञान सुलभ करून दिलं जातं.जगभरातील गलबल लीडर्स, पार्टनर्स आणि कर्मचाऱ्यांच्या साथीने SAP च्या माध्यमातून लोकांचं जीवनमान सुधारण्यास आणि जगाला एक अधिक चांगली जागा बनवण्यास मदत केलीजाते. अधिक माहितीसाठी, SAP.com ला भेट द्या.


झी बिझनेस बद्दल...


ZEE बिझनेस हे भारतातील नंबर 1 चं हिंदी बिझनेस न्यूज चॅनल आहे. चॅनेलने आपल्या नाविन्यपूर्ण प्रोग्रामिंगद्वारे देशभरातील नागरिकांच्या मनात एक विशेष स्थान पटकावलं आहे. ZEE बिझनेच्या माध्यमातून आपल्याला दिवसभर बाजारातील चढ-उताराच्या प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स दिले जातात. झी बिझनेस खऱ्या अर्थाने बदलत्या भारताचं प्रतिबिंब आहे. ZEE बिझनेसची प्रोग्रामिंग कमालीची तीक्ष्ण आहे, ज्यामध्ये जागतिक बाजारपेठेपासून ते देशांतर्गत गुंतवणुकीच्या संधी किंवा तुमचे तुमचे पैसे कुठे गुंतवावेत अशा असंख्य विषयांचा समावेश आहे. पाहा झी बिझनेस, पाहा भारताचे परिवर्तन.. भेट द्या: http://www.zeebiz.com संकेतस्थळावर.


SAP India and Zee Business launch the fourth edition of Dare to Dream Awards 2022 : Honoring the entrepreneurial zest of India, this year's theme will celebrate the "next big leap" made possible by the pioneers of new India