Bangladesh Sapla Akhtar: पब्जी खेळताना प्रेम झाले आणि पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमाची कहाणी आता सर्वांपर्यंत पोहोचली असेल. कराचीतून आपल्या 4 मुलांना घेऊन ती सचिनच्या घरी राहायला आली. शेजारील देश पाकिस्तानमधून पळून गेल्यानंतर भारताच्या ग्रेटर नोएडा I सीमेवरची कहाणी खूप रंजक आहे. आता अशीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. आताची प्रेमिका पाकिस्तानातून नसून बांग्लादेशमधून येऊन पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पोहोचली आहे. या दोन कहाण्या दिसयला सारख्याच दिसत असल्या तरी यात मोठा फरक आहे. सीमा तिचा पती हैदरसोबत सुखी जीवन जगत आहे. पण बांगलादेशातून सिलीगुडीला आलेली ही मुलगी पोलिसांच्या ताब्यात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सपला अख्तर (21 वर्षे) ही महिला बांगलादेशातून प्रेमासाठी जीव धोक्यात घालून भारतातील सिलीगुडी येथे आली होती. मात्र भारतात आल्यानंतर महिलेला तिच्या प्रियकराचा खरा हेतू समजल्यानंतर तिने तेथून पळ काढला. तिचा प्रियकर धोका देणारा असल्याचे तिच्या लक्षात आले. 


बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपला अख्तरचे भारतातल्या तरुणासोबत सुत जुळले. त्या प्रियकरासाठी अडीच महिन्यांपूर्वी ती बांगलादेशातून अवैधरित्या भारतात दाखल झाली होती. यानंतर ती सिलीगुडीमध्ये तिच्या प्रियकरासोबत आनंदाने दिवस घालवत होती. तिचा प्रियकर तिला नेपाळमध्ये विकण्याचा कट रचत असल्याचे तिच्या लक्षात आले.


आपल्यासोबत प्रेम नाही तर धोका झालाय हे समजताच तरुणीच्या डोक्यातून प्रेमाचे भूत धाडकन उतरले. ती प्रियकरापासून आपला जीव वाचण्यासाठी पळून गेली. 


सपला अख्तर ट्रेन पकडण्यासाठी सिलीगुडी रेल्वे जंक्शनवर पोहोचली होती, असे सांगण्यात आले, तेव्हाच संशयास्पद स्थितीत फिरताना एका स्वयंसेवी संस्थेने तिला  पाहिले.


सपनाची रवानगी तुरुंगात


सपला अख्तरला असे एकटी पाहून संघटनेच्या सदस्यांनी तिला प्रधान नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले. तिची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. बांगलादेशी तरुणीला बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.


यानंतर तिला सिलीगुडी न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून आरोपी सपला अख्तरला तुरुंगात पाठवण्यात आले. सपला हाती लागली असली तरी तिचा प्रियकर असाच सुटणार नाही. पोलीस त्याच्यादेखील मागावर आहेत. सिलीगुडी पोलिसांनी आरोपी तरुणीच्या प्रियकराचा सर्वत्र शोध सुरू केला आहे. लवकरच त्यालादेखील ताब्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. 


सीमा आणि सचिनची कहाणी


2020 मध्ये पाकिस्तानच्या कराचीमध्ये राहणाऱ्या सीमा हैदरची पब्जी गेमच्या माध्यमातून ग्रेटर नोएडाच्या सचिनशी मैत्री झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले आणि 10 मार्च रोजी दोघेही नेपाळमधील एका हॉटेलमध्ये भेटले. त्यादरम्यान दोघांनीही मंदिरात लग्न केल्याचा दावा सीमाने केला आहे. पण नंतर ते आपापल्या देशात परतले. सीमा आणि सचिनला एकमेकांसोबत राहायचे होते. पण सीमाला आधीच 4 मुले होती. सचिनने आपल्या मैत्रिणीच्या मुलांना दत्तक घेण्याचे मान्य केले. त्यानंतर आपण भारतात येण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. 10 मे रोजी ती आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातील कराची शहरातून शारजाहला पोहोचली. त्यानंतर येथून विमानाने काठमांडूला पोहोचली. खासगी वाहनाने काठमांडूहून पोखरा येथे पोहोचली.


त्यानंतर त्यांनी पोखरा येथून दिल्लीला जाण्यासाठी बस पकडली. सचिन वाटेत नोएडामध्ये त्यांची वाट पाहत होता. 13 मे रोजी सीमा 28 तासांनंतर नोएडाला पोहोचली. त्यानंतर सचिन त्यांना घेऊन राबुपुरा भागात गेला. याठिकाणी दोघांनीही भाड्याने घर घेतले आणि ते आरामात राहू लागले. मात्र पोलिसांना याची माहिती मिळाली आणि 4 जुलै रोजी सचिन आणि सीमा यांना अटक करण्यात आली. मात्र, दोघेही कोर्टातून जामिनावर सुटले आहेत.