पृथ्वीवरील अदृष्य नदीचे पुरावे पाहून संशोधक अचंबित! 5500 वर्षापूर्वीचा रहस्यमयी इतिहास आणि भारतातील 5 राज्यांशी थेट कनेक्शन
Invisible River Sarasvati River : 5500 वर्षांपूर्वी 5 राज्यातून वाहणारी भारतातील सर्वात पवित्र नदी पृथ्वीवरुन नष्ट झाल्याचा दावा केला जातो. मात्र, ही नदी अदृष्यपणे प्रवाहित आहे.
Sarasvati River Facts : या पृथ्वीतलावर एक अशी नदी आहे जी अस्तित्वात नाही पण, या नदीच्या अस्तित्वाचे पुरावे मात्र आहेत. म्हणूनच ही नदी अदृष्य नदी म्हणून ओळखली जाते. पृथ्वीवरील या अदृष्य नदीचे वास्तविक पुरावे पाहून संशोधक अचंबित झाले आहेत. या रहस्यमयी नदीचा इतिहास हा 5500 वर्ष जुना असून या नदीचे भारतातील 5 राज्यांशी थेट कनेक्शन आहे.
पृथ्वीवरील ही अदृष्य नदी भारतातील सर्वात पवित्र नदी आहे. प्रयागमध्ये त्रिवेणीचा संगम होतो. त्रिवेणी म्हणजे तीन नद्यांचा संमग. इथं ज्या तीन नद्यांचा संगम होतो त्यापैकीच एक आहे ह पृथ्वीवरील अदृष्य नदी. या नदीचे नाव आहे सरस्वती. प्रयागमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. प्रयाग येथे गंगा आणि यमुना यांचा संगम सर्वांना दिसतो. पण सरस्वती (Sarasvati River Fact’s) नदीचे प्रत्यक्षात अस्तित्व दिसून येत नाही. सरस्वती नदी अदृश्यपणे वाहत प्रयागला पोहोचते आणि इथे आल्यावर गंगा आणि यमुनेचा त्रिवेणी संगम होतो असा दावा केला जातो. संशोधकांना सरस्वती नदीच्या अस्तित्वाबाबत जे पुरावे सापडले आहेत ते अचंबित करणारे आहेत.
सरस्वती नदी बाबतचे वैज्ञानिक सत्य
सरस्वती नदीचा इतिहास 5500 वर्ष जुना आहे. सरस्वती नदी भारतीय उपखंडाच्या उत्तर-पश्चिम भागातून वाहायची. हिमालयात सरस्वती नदीचा उगम झाला. पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थान आणि गुजरातमधून पश्चिमेला सिंधू नदी आणि पूर्वेला गंगा नदीच्या दरम्यान ही नदी वाहत गेली. शेवटी कच्छच्या आखातात अरबी समुद्रात ही नदी विलीन झाल्याचा दावा काही संशोधक करतात.सरस्वती नदीचा उगम आणि तिच्या गायब होण्याच्या संभाव्य कारणांचा सखोल अभ्यास केला आहे. यावरुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
एकेकाळी वायव्य भारत आणि पाकिस्तानमधून वाहणाऱ्या या नदीचे वास्तविक पुरावे भूवैज्ञानिकांना मिळाले आहेत. होलोसीन युग (गेली 11,700 वर्षे) दरम्यान ही नदी अस्तित्वात होते. 28,000 वर्षापूर्वी ही नदी अस्तित्वात होती. पृथ्वीच्या अंतर्भागाच्या रचनेत झालेल्या बदलामुळे सरस्वती भूगर्भात नष्ट झाल्याचा दावा केला जातो.
सरस्वती नदीचे पौराणिक महत्व
सरस्वती नदी कोठेही अस्तित्वात नाही आणि ती केवळ एक पौराणिक संकल्पना असल्याचा दावा केला जातो. मात्र, पौराणिकदृष्ट्या ही नदीला विशेष महत्व आहे. या नदीच्या काठावर ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र होते असे म्हणतात.