मुंबई : तुम्ही इंडियन नौदलाच्या नोकरीच्या शोधात असाल तर ही हातची संधी जाऊ देऊ नका. इंडियन नौदलात आता 2500 पदांची भरती सुरु आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. सीनियर सेकेंडरी रिक्रूट (SSR) चे 2000 पद आणि आर्टिफीसर अप्रेंटिस (AA) चे 500 पदांवर भरती होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पदांसाठी 5 मेपर्यंत अर्ज करता येतील. जर तुम्हाला भारतीय नौदलात नोकरी मिळवायची असेल तर, लवकरात लवकर अर्ज करा. अर्जदाराच्या उच्च माध्यमिक शाळा आणि विद्यालयाच्या गुणवत्ता यादी नुसार प्राधान्य दिले जाईल. ज्या उमेदवारांची गुणवत्ता यादीमध्ये नाव असेल त्यांनाच परीक्षेसाठी बोलावण्यात येईल.


ही गुणवत्ता यादी 23 जुलै 2021 रोजी जाहीर केली जाईल. रिक्त पदां विषयी अधिक माहिती खाली दिली आहे.


एकूण पदांची संख्या - 2500


आर्टिफीसर अप्रेंटिस (AA) - 500 पदे


सीनियर सेकेंडरी रिक्रूट (SSR)2000 पदे


पात्रता


उमेदवाराने भारत सरकार / राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शाळा / बोर्डातून १२ वी पास (Science) असावा. बारावीमध्ये गणित, भौतिकशास्त्र हा विषय असावा. तसेच रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा संगणक विज्ञान विषयांपैकी एका विषयात अभ्यास केलेला असावा.


आर्टिफीसर अप्रेंटिससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे इंटरमीडिएटमध्ये किमान 60% गुण असले पाहिजेत.


वयोमर्यादा


ज्या उमेदवारांचा जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 दरम्यान झाला आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.


निवड प्रक्रिया


लेखी परीक्षा, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.


अर्ज फी


सामान्य आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज फी 205 रुपये आहे. एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गासाठी अर्ज फी नाही. अर्ज फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे जमा केली जाऊ शकते.


वेतन


दरमहा 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये प्रति महिना


अर्ज कसा करावा


इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या www.joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.