Video : Say मम्...; सत्यनारायण पुजेचं English Version तुम्ही कधी पाहिलंय का?
ऐकाच... सत्यनारायणाची कथा....
मुंबई : आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात किंवा ओळखीत अशी एकतरी व्यक्ती असते, ज्यांचं सोशल मीडियावर प्रचंड प्रेम असतं. ही व्यक्ती मग शक्य त्या सर्व वेळप्रसंगी शक्य त्या माध्यमातून आपल्यापर्यंत सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या व्हिडीओ आणि फोटो आणत असते. (satyanarayan pooja)
सध्या अशाच एका व्यक्तीनं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये एक कुटुंब पुजाविधी करत असल्याचं दिसत आहे. पुढ्यात सर्व पूजासाहित्य, देवासाठी केलेली आरास, पारंपरिक वेशभूषेत असणारं कुटुंब असं एकंदर चित्र या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
खरी गंमत पुढे आहे, कारण व्हिडीओमध्ये दिसणारे ब्राह्मण चक्क इंग्रजीमध्ये पूजा सांगत आहेत. तुम्हीआम्ही आतापर्यंतच्या आयुष्यात एकदातरी सत्यनारायणाची पूजा पाहिली असेल, ऐकलीही असेल.
इंग्रजी पूजा पाहण्याची ही अनेकांचीच पहिली वेळ असावी. पूजासाहित्य आणि ते मांडण्याची पद्धत पाहता दाक्षिणात्य संस्कृतीनुसार ही पूजा मांडली आणि सांगितली जात असल्याचं कळत आहे. (Viral Video)
मुद्दा काय, तर सध्या प्रचंड कौतुक होतंय ते म्हणजे हा व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गुरुजींचं. जे अस्खलित इंग्रजी भाषेत अगदी सुरेखपणे ही पूजा सांगत आहेत. तुम्हाला कसा वाटला हा भन्नाट व्हिडीओ?