सावित्रीबाई पुणे विद्यापीठ देशात नवव्या क्रमांकावर
आयआयटी मद्रास देशातील सर्वश्रेष्ठ शिक्षणसंस्था
नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील शिक्षण संस्थांची श्रेणी जाहीर केली असून त्यात आयआयटी मद्रास पहिल्या क्रमांकावर आहे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, बंगळुरू या संस्थेला दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबई अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ही यादी जाहीर केली.
देशातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकावर बंगळुरुची इंडियन इन्स्टीट्युट ऑफ सायन्स आहे. तर त्यानंतर दिल्लीचं जवाहरलाल नेहरु विद्यापीठ आणि वाराणसीचे बनारस हिंदू विद्यापीठ या विद्यापीठांचा दुसरा आणि तिसरा क्रमांक आहे. पुण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात नवव्या क्रमांकावर आहे. पुणे विद्यापीठाने गतवर्षाच्या तुलनेत चांगली कामगिरी करून दहाव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
सर्वश्रेष्ठ बिझनेस स्कूल म्हणून आयआयएम अहमदाबाद पहिल्या क्रमांकावर आहे. तर आयआयएम बंगळुरू दुसऱ्या आणि आयआयएम कोलकाता तिसऱ्या क्रमांकावर आहे.
वैद्यकीय क्षेत्रात दिल्लीची एम्स ही संस्था देशातली सर्वश्रेष्ठ संस्था ठरली आहे. पीजीआयएमईआर, चंदिगड दुसऱ्या स्थानावर आहे तर वेल्लोरचे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज तिसऱ्या क्रमांकावर आहे.
देशातील श्रेष्ठ दंत महाविद्यालयांची यादी प्रथमच जाहीर करण्यात आली. त्यात दिल्लीच्या मौलाना आझाद इन्स्टिड्युट ऑफ डेंटल सायन्स ही संस्था पहिल्या क्रमांकावर आहे. उडपीचे मनिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पुण्याचे डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज अँन्ड हॉस्पिटल तिसऱ्या क्रमांकावर आहे.