SBI ग्राहकांनो हे वाचाच...नाहीतर काम होणार ठप्प
जर तुमचेही या बँकेत खाते असेल, तर तुमच्यासाठी महत्वाची सुचना आहे.
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमचेही या बँकेत खाते असेल, तर तुमच्यासाठी महत्वाची सुचना आहे. 17 जूनला बँकेची ऑनलाईन सुविधा बंद राहणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आपल्या ग्राहकांना सुविधा देण्यात नेहमी तप्तर असते, ज्यामुळे ग्राहकांना घर बसल्या किंवा बँकेत न जाता डिजिटल सुविधेचाही लाभ घेता येतो. परंतु आता बँकेने ट्विट करुन ग्राहकांना माहिती दिली आहे की, 17 जून 2021 ला 00.30 ते 02.30 वाजेपर्यंत बँकेचे मेंटेनेंसचे काम सुरू असणार आहे. त्यामुळे दोन तासांसाठी इंटरनेट बँकिंग, योनो अॅप (YONO App), योनो लाईट (YONO Lite) आणि यूपीआयची (UPI) सुविधा देखील बंद राहणार आहेत.
SBI YONO काय आहे ?
एसबीआय योनो हे एक इंटिग्रेटेड डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे. याच्या माध्यमातून ग्राहक अनेक प्रकारच्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. यामुळे ग्राहकांना आर्थिक सुविधांसह विमानसेवा, रेल्वे, बस आणि टॅक्सी बुकिंग, ऑनलाईन शॉपिंग किंवा मेडिकल बिल पेमेंटवर सुविधा मिळते. Android आणि IOS दोन्ही यूजर्स याचा सोप्या पद्धतीने वापर करु शकतात.
22 हजाराहून अधिक शाखा
देशभरात एसबीआय बँकेच्या 22 हजाराहून अधिक शाखा आहेत. तसेच 58 हजाराहून अधिक एटीएम आणि सीडीएमचे नेटवर्क आहे. बँकेचे 8.5 कोटी ग्राहक इंटरनेट बँकिंग आणि 1.9 कोटी ग्राहक मोबाईल बँकिंगचा वापर करतात. याशिवाय बँकेचे इंटीग्रेटेड डिजिटल अॅण्ड लाईफस्टाईल प्लॅटफॉर्म योनोला ग्राहकांनी अधिक पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 7.4 कोटीहून अधिक ग्राहकांनी या अॅपला डाऊनलोड सुद्धा केले आहे.
3.45 कोटी लोकांचा योनो वापर
यावेळी एसबीआयमध्ये योनोचे 3.45 कोटी रजिस्टर्ड यूजर्स आहेत. तसेच दिवसाला जवळपास 90 लाख ग्राहक लॉगईन करतात. डिसेंबर 2020 मध्ये एसबीआयमध्ये 15 लाखांहून अधिक खाते योनोच्या माध्यमातून उघडण्यात आले.