मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने ग्राहकांना अलर्ट केलं आहे. बँकेने त्यांच्या खातेदारांना 31 मार्च 2022 पूर्वी पॅन-आधार कार्ड लिंक करण्यास सांगितलं आहे. जर ग्राहकांनी तसं केलं नाही तर त्यांची बँकिंग सेवा बंद होऊ शकते, असं बँकेने म्हटलंय. एसबीआयने याबाबत ट्विटदेखील केलं आहे.


31 मार्च पर्यंत वेळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआयने म्हटलंय की, "आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देतो की, कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आणि बँकिंग सेवेचा सुरु राहण्यासाठी पॅन आधारशी लिंक करा. यासोबतच पॅनला आधारशी लिंक करणं अनिवार्य असल्याचंही बँकेकडून सांगण्यात आलंय. 



कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली होती.


कसं कराल पॅन कार्ड आधार कार्डला लिंक


  • सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा.

  • यानंतर, डाव्या बाजूला आधार लिंकचा पर्याय दिसेल, ज्यावर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल. 

  • जिथे तुम्हाला PAN, AADHAAR आणि आधार मध्ये तुमचं नाव टाकावं लागेल. 

  • तुमच्‍या आधार कार्डमध्‍ये तुमच्‍या केवळ जन्‍म वर्ष असेल तर तुम्‍हाला आधार कार्डमध्‍ये I have only birth year या बॉक्सवर खूण करावी लागेल. 

  • नंतर कॅप्चा कोड टाका. 

  • यानंतर आधार लिंकवर क्लिक करा आणि तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक होईल