मुंबई : एसबीआयच्या असोसिएट बँका आणि भारतीय महिला बँकेचे चेकबुक ३१ मार्चपर्यंत बदलून घेण्याबाबाबतचे आदेश स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ मार्चनंतर महिला बँकेसह एसबीआयच्या काही असोसिएट बँकांची चेकबुक वैध नसतील. जर तुम्ही त्यापूर्वी चेकबुक बदलली नाहीत तर तुमच्यासाठी समस्या होऊ शकते. 


गेल्या वर्षी भारतीय महिला बँक, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ त्रवणकोर या बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण झाले. 


याआधी ३० सप्टेंबर होती अंतिम तारीख


या बँकाचे एसबीआयमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर एसबीआयने यांच्या चेकबुक बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वेळ दिली होती. त्यानंतर ही मर्यादा वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली होती. मात्र ग्राहकांची समस्या लक्षात घेता ही मर्यादा ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती. जर तुमच्याकडेही वर दिलेल्या सहा बँकांपैकी कोणत्या बँकेचे चेकबुक असेल तर लगेचच बदलून घ्या.


ट्विटर अकाऊंटवरुन दिली माहिती


एसबीआयने आपल्या ग्राहकांना ट्विटरवरुन ही माहिती दिलीये. जर तुम्ही ३१ मार्च आधी चेकबुक बदलून घेतले नाही तर १ एप्रिलनंतर तुमचे जुने चेकबुक चालणार नाही. 


असे करा अप्लाय


एसबीआयचे ग्राहक नव्या चेकबुकसाठी इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अथवा एटीएमद्वारे अप्लाय करु शकतात.